शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : नॅशनल मेडिकल कमिशनचा निषेध, कुडाळात सायकल रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 15:47 IST

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्यावतीने केंद्र सरकार आणू पहात असलेल्या नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाला विरोध व निषेध करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा इंडियन मेडिकल असोसिएशनच्यावतीने रविवारी कुडाळ शहरातून निषेधाच्या घोषणा देत सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी खासदार विनायक राऊत यांनी डॉक्टर व समाजाला हितकारक ठरणाऱ्याच निर्णयासोबत राहणार असल्याचे आश्वासन असोसिएशनला दिले.

ठळक मुद्देनॅशनल मेडिकल कमिशनचा निषेध, कुडाळात सायकल रॅली डॉक्टर, समाजाला हितकारक ठरणाऱ्या निर्णयासोबत राहणार : विनायक राऊत

सिंधुदुर्ग : राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्यावतीने केंद्र सरकार आणू पहात असलेल्या नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाला विरोध व निषेध करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा इंडियन मेडिकल असोसिएशनच्यावतीने रविवारी कुडाळ शहरातून निषेधाच्या घोषणा देत सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी खासदार विनायक राऊत यांनी डॉक्टर व समाजाला हितकारक ठरणाऱ्याच निर्णयासोबत राहणार असल्याचे आश्वासन असोसिएशनला दिले.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रॅली कुडाळ शहरातून काढण्यात आली. कुडाळ हायस्कूल ते जिजामाता चौक, शिवाजी चौक, समादेवी मंदिर, बाजारपेठ, गांधी चौक व पुन्हा कुडाळ हायस्कूल अशी रॅली काढण्यात आली.या रॅलीचा शुभारंभ खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते झाला. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, अमरसेन सावंत, संतोष शिरसाट, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट तसेच कुडाळ, मालवण, सावंतवाडी तालुक्यांच्या इंडियन मेडिकल असोसिएशन, कुडाळचे अध्यक्ष डॉ. राजेश्वर उबाळे, कणकवलीचे अध्यक्ष डॉ. नितीन शेट्ये, डॉ. अनिल नेरूरकर, सचिव डॉ. संजय केसरे, डॉ. जयेंद्र्र परूळेकर, डॉ. संजीव आकेरकर, डॉ. जयसिंग रावराणे, डॉ. संजय निगुडकर, डॉ. योगेश नवांगुळ, राजेश नवांगुळ, प्रवीण बिरमोळे, डॉ. मकरंद परूळेकर, डॉ. शंतनू पावसकर, अमोल पावसकर, सुधीर रेडकर, डॉ. श्रुती सामंत, डॉ. विशाखा पाटील, डॉ. गौरी परूळेकर, डॉ. संजना केसरे, डॉ. सुशांता कुलकर्णी, डॉ. अश्विनी खानोलकर, डॉ. जी. टी. राणे, डॉ. धीरज सावंत आदी उपस्थित होते.यावेळी डॉ. केसरे यांनी सांगितले की, केंद्र्र सरकार राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्यावतीने आणू पहात असलेले नॅशनल मेडिकल कमिशन हे विधेयक अंमलात आल्यास देशातील वैद्यकीय क्षेत्रावर त्याचा मोठा परिणाम होणार आहे. तसेच डॉक्टरांना व जनतेला त्रासदायक ठरणार आहे.

या विधेयकामुळे छोटे दवाखाने बंद पडून उपचार खर्च मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. याचा त्रास देशातील सर्व जनतेला सहन करावा लागणार आहे. ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा व समाजहिताच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक असलेल्या नॅशनल मेडिकल कमिशन बिलाचा इंडियन मेडिकल असोसिएशनच्यावतीने आम्ही निषेध करीत आहोत, असे सांगितले.

समाजहिताच्या दृष्टीने समाजातील सर्व व्यक्तींनी हे विधेयक मंजूर होऊ नये म्हणून सर्व स्तरातून याच्याविरोधात आवाज उठवावा, असे आवाहनही डॉ. केसरे यांनी जनतेला केले. या सायकल रॅलीत जिल्ह्यातील बहुसंख्य डॉक्टरांनी सहभाग घेतला. विधेयकाच्या विरोधात निषेधाची जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. रॅलीच्यावेळी पोलीस विभागानेही विशेष सहकार्य केल्याचे डॉ. केसरे यांनी सांगितले.असोसिएशनने निवेदनातून वेधले खासदारांचे लक्षयावेळी खासदार राऊत यांना असोसिएशनच्यावतीने निवेदन देण्यात आले. हे विधेयक किती धोकादायक आहे याबाबत राऊत यांचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी राऊत यांनी हे बिल मंजुरीसाठी पुन्हा एकदा मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सभागृहात येईल, त्यावेळी डॉक्टर व समाजहिताच्या दृष्टीने आम्ही बाजू मांडू व तुमच्यासोबत राहू, अशी ग्वाही दिली. तसेच इतरही लेखी समस्या देण्याचे आवाहन केले.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गHealthआरोग्य