सायकल रॅली जळगावकडे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 11:35 AM2018-02-24T11:35:17+5:302018-02-24T11:35:17+5:30

पोलीस प्रशासन : १६०० किमी अंतर, पथकात १२ जण सहभागी

Bicycle rally to Jalgaon | सायकल रॅली जळगावकडे रवाना

सायकल रॅली जळगावकडे रवाना

Next
ठळक मुद्देपोलीस प्रशासनाकडून उपक्रमनाशिक शहर पोलिसांचा पुढाकारआरोग्यासाठी फलदायी 

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : सुरक्षित वाहतूक आणि आरोग्यासाठी सायकल किती उपयुक्त आहे, असा संदेश देत नाशिक येथील १२ सायकल पटूंनी १ हजार ६०० किमी अंतराची सायकल परिक्रमा सुरु केली आहे़ नाशिक येथून निघालेली ही रॅली शुक्रवारी सकाळी जळगावकडे मार्गस्थ झाली़ 
नाशिक शहर पोलीस आणि एअरफोर्स स्टेशन देवळाली यांच्यातर्फे  निघालेली ही सायकल रॅली नाशिक, धुळे, जळगाव, वाशिम, शिर्डी, नाशिक या मार्गाने फिरणार आहे़ गुरुवारी या रॅलीचे स्वागत पोलीस अधीक्षक व पथकाने केले़ शुक्रवारी सकाळी ही रॅली जळगावकडे रवाना झाल्यानंतर शुभेच्छा देण्यासाठी पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते़ 

Web Title: Bicycle rally to Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.