शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : युवक काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, शासनाचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 15:57 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाढत चाललेली महागाई, सरकारी रूग्णालयात डॉक्टरांची असलेली रिक्त पदे, औषधांचा तुटवडा, महिलांवरील वाढते अत्याचार या विरोधात जिल्हा युवक काँग्रेसने आक्रमक होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत शासनाचे लक्ष वेधले.

ठळक मुद्देयुवक काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, शासनाचा निषेधवाढती महागाई,अत्याचाराबाबत वेधले लक्ष

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाढत चाललेली महागाई, सरकारी रूग्णालयात डॉक्टरांची असलेली रिक्त पदे, औषधांचा तुटवडा, महिलांवरील वाढते अत्याचार या विरोधात जिल्हा युवक काँग्रेसने आक्रमक होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत शासनाचे लक्ष वेधले.

विविध घोषणा देत युती सरकारचा जाहीर निषेध नोंदविला. या ज्वलंत प्रश्नांवर वेळीच तोडगा काढावा अन्यथा जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा युवक काँग्रेसचे अध्यक्ष देवानंद लुडबे यांनी प्रशासनाला दिला आहे.जिल्ह्यातील वाढती महागाई व यात होरपळत चाललेली सर्वसाधारण जनता यासह विविध मुद्द्यांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सिडको बिल्डिंग ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढला. यावेळी विविध शासन विरोधी घोषणा देत परिसर दणाणून सोडला. मोर्चा देवानंद लुडबे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विकास सावंत यांच्या उपस्थितीत काढण्यात आला.

यावेळी विधानसभा अध्यक्ष भाई जेठे, महेंद्र सांगेलकर, असिम वागळे, बाळा गावडे, प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण, इर्शाद शेख, विभावरी सुखी, दादा परब, महिंद्र सावंत, बाळू अंधारी, ऋतिका कुबल, स्नेहल खोबरेकर, प्रकाश डिचोलकर, अमिदी मेस्त्री, अरविंद मोंडकर, श्रीकृष्ण तळवडेकर, कौस्तुभ गावडे आदी उपस्थित होते.मोर्चा दुपारी बाराच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. शिष्टमंडळाच्यावतीने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, मच्छिमार व्यावसाया करिता सोसायट्यांना पुरविण्यात येणारा डिझेल परतावा शासनाकडे प्रलंबित आहे.याचा भुर्दंड मच्छिमार बांधवांनी का सहन करावा ? यातील त्रुटी दूर करून सरकारने भरपाई करावी.

गॅस सिलेंडरचे दर गगनाला भिडले आहेत ते कमी करावेत. सिंधुदुर्ग जिल्हा सरकारी रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची रिक्त पदे भरण्यात आलेली नाहीत. आॅपरेशन होत नाहीत. औषध उपलब्ध होत नाहीत परिणामी येथील काही कर्मचारी औषधोपचार करण्यासाठी खासगी रुग्णालयात जाण्यास सांगतात.

जिल्ह्यात बलात्कार,चोऱ्या यासह इतर गुन्हेगारी वाढत चालली आहे. यावर प्रशासनाचा अंकुश नसल्याचे स्पष्ट होते. भ्रष्टाचारी अधिका-यां विरोधात पुरावे देवूनसुद्धा कारवाई होत नाही. त्यामुळे या सर्व मुद्द्यांवर गांर्भीयाने विचार होवून तोडगा काढावा अन्यथा भविष्यात तीव्र आंदोलन छेडले जाईल. 

टॅग्स :congressकाँग्रेसsindhudurgसिंधुदुर्ग