शहरं
Join us  
Trending Stories
1
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
2
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
3
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
4
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
5
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा 'चतुर' मारा; ऋतुराज गायकवाड एकटा भिडला अन् विराटला... 
6
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
7
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
8
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
9
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
10
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
11
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
12
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
13
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
14
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
15
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
18
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
19
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
20
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार

सिंधुदुर्ग : रेल्वे कर्मचाऱ्याने वाचवले चिमुकल्याचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 2:00 PM

कणकवली रेल्वे स्टेशनवर काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. कणकवली रेल्वेशनवर कार्यरत असलेले पार्इंटमन जगन्नाथ उर्फ जगू राणे यांनी चालती गाडी पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका चिमुकल्याचे प्राण वाचविले. रेल्वे कर्मचाऱ्यांने तत्परता दाखवून चिमुकल्याचे प्राण वाचविल्याने त्याचे कौतुक होत आहे.

ठळक मुद्देरेल्वे कर्मचाऱ्याने वाचवले चिमुकल्याचे प्राणजगन्नाथ राणे यांचे कौतुक

सिंधुदुर्गनगरी : कणकवली रेल्वे स्टेशनवर काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. कणकवली रेल्वेस्टेशनवर कार्यरत असलेले पार्इंटमन जगन्नाथ उर्फ जगू राणे यांनी चालती गाडी पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका चिमुकल्याचे प्राण वाचविले. रेल्वे कर्मचाऱ्यांने तत्परता दाखवून चिमुकल्याचे प्राण वाचविल्याने त्याचे कौतुक होत आहे.हॉलिडे स्पेशलने गणपतीला गावी येत असलेल्या कुटुंबातील एक गृहस्थ गाडी क्रॉसींगसाठी कणकवली स्टेशनला खूप वेळ थांबल्याने प्लॅटफॉर्मवर उतरले. आपले वडील गाडीतून उतरले आहेत हे पाहून त्यांचा लहान मुलगा उत्सुकतेपोटी उतरला. याची त्यांच्या वडिलांना कल्पना नव्हती. क्रॉसींगचा टाईम संपताच रेल्वे मार्गस्थ होण्यासाठी सुरू झाली.

हळुहळू वेग घेणाऱ्या गाडीत वडील चढत आहेत. आपण खाली राहिलो हे लक्षात येताच त्या मुलाने टाहो फोडला. तसेच वेग घेतलेल्या गाडीला पकडण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळा रेल्वे स्टेशनवर कार्यरत असलेले पॉईंटमन जगन्नाथ राणे यांचे मुलावर लक्ष गेले. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्या मुलाकडे धाव घेत त्याला पकडत आपल्या ताब्यात घट्ट पकडून ठेवत चालत्या गाडीत चढण्यापासून परावृत्त केले आणि अनर्थ टळला.याचवेळी स्टेशन मास्तर रंजना माने यांनी तत्परतेने रेल्वे गार्डमार्फत गाडी थांबवून भेदरलेल्या अवस्थेतील त्या छोट्या मुलाला त्याच्या वडिलांच्या स्वाधीन केले. आणि गाडी मार्गस्थ झाली. यावेळी त्या मुलांच्या वडिलांचेच नाही तर प्रसंग पाहणाऱ्या सर्वांचेच डोळे पाणावले. जगन्नाथ राणे यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. या घटनेचे साक्षीदार असलेले रेल्वे कर्मचारी प्रशांत सावंत यांनी ही माहिती दिली.प्लॅटफॉर्मवर उपस्थित प्रवासी आणि कर्मचाऱ्यांनी राणेंच्या समयोचित कार्यतत्परतेचे कौतुक केले. तसेच याच कार्यतत्परतेची दखल घेत नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्यावतीने राणे आणि माने यांचा वरिष्ठांच्या हस्ते लवकरच सत्कार करण्यात येणार आहे, असे नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे विभागीय सचिव कुमार घोसाळकर यानी स्पष्ट केले.

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेsindhudurgसिंधुदुर्ग