शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : दारू वाहतूक करणारे वाहन ताब्यात,एकाला अटक, उत्पादन शुल्कची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 15:05 IST

कुडाळ झाराप येथे बेकायदेशीररित्या वाहतूक करणाऱ्या वाहनावर केलेल्या कारवाईत ७६ हजार ८०० रुपयांच्या गोवा बनावटीच्या दारूसह १२ लाख ७६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ठळक मुद्दे दारू वाहतूक करणारे वाहन ताब्यात७६ हजारांच्या दारूसह १२ लाखांचा मुद्देमाल जप्त

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने २८ आॅगस्ट रोजी रात्री कुडाळ झाराप येथे बेकायदेशीररित्या वाहतूक करणाऱ्या वाहनावर केलेल्या कारवाईत ७६ हजार ८०० रुपयांच्या गोवा बनावटीच्या दारूसह १२ लाख ७६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अवैध दारू वाहतूक प्रकरणी वाहनचालक तुकाराम रामचंद्र नाईक (२२, रा. आरोस-गिरोबावाडी, सावंतवाडी) याला अटक करण्यात आली असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आली.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून नाकाबंदी करण्यात आली होती. दरम्यान रात्री ९.३० वाजता गोव्याहून मुंबईच्या दिशेने वेगात जाणारी निळ्या रंगाची कार (जी. ए. ११, ए - ३१५६) दारूबंदी कायद्यांतर्गत तपासणीसाठी थांबविण्यात आली. या वाहनाच्या डिकीमध्ये व मागील सीटवर गोवा बनावटीच्या दारूचे खोके ठेवण्यात आल्याचे दिसून आले.या गोवा बनावटीच्या दारुची ७६ हजार ८०० रुपये एवढी किंमत असून या अवैध दारूची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली १२ लाखांची कारही जप्त करण्यात आली आहे. तर अवैध दारू वाहतूक प्रकरणी वाहनचालक तुकाराम रामचंद्र नाईक याला अटक करण्यात आली आहे.ही कारवाई निरीक्षक एस. एस. साळवे, जवान आर. डी. ठाकुर, मानस पवार, वाहनचालक शिवशंकर मुपडे, एच. आर. वस्त, अवधूत सावंत या भरारी पथकाने केली आहे.भरारी पथकाची नाकाबंदी२८ आॅगस्ट रोजी रात्री जिल्ह्यातून गोवा बनावटीच्या दारुची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर विभागीय उपायुक्तांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी याबाबतची माहिती जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिली होती. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने कुडाळ झाराप येथे नाकाबंदी केली होती. 

टॅग्स :liquor banदारूबंदीsindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारी