शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : आॅपरेशन आॅल आऊटमध्ये ६२ खटले दाखल, मध्यरात्री पोलिसांची मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 15:39 IST

कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी संपूर्ण जिल्ह्यात १९ मार्च रोजीच्या मध्यरात्री राबविण्यात आलेल्या आॅल आऊट आॅपरेशनमध्ये मोटार वाहन कायद्यांतर्गत ६२ खटले दाखल करण्यात आले आहेत. तर दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या सहा जणांविरोधात खटले दाखल करण्यात आले. याचबरोबर फरारी, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आरोपींची कसून तपासणी करण्यात आली.

ठळक मुद्देआॅपरेशन आॅल आऊटमध्ये ६२ खटले दाखल मध्यरात्री पोलिसांची मोहीम फरारी, गुन्हेगारांची कसून चौकशी

सिंधुदुर्गनगरी : कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी संपूर्ण जिल्ह्यात १९ मार्च रोजीच्या मध्यरात्री राबविण्यात आलेल्या आॅल आऊट आॅपरेशनमध्ये मोटार वाहन कायद्यांतर्गत ६२ खटले दाखल करण्यात आले आहेत. तर दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या सहा जणांविरोधात खटले दाखल करण्यात आले. याचबरोबर फरारी, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आरोपींची कसून तपासणी करण्यात आली.१९ मार्च रोजी रात्री १० ते मंगळवारी पहाटे ५ वाजेपर्यंत आॅल आऊट आॅपरेशन राबविण्यात आले. या आॅपरेशनसाठी एक उपविभागीय पोलीस अधिकारी, सहा पोलीस निरीक्षक, अकरा सहाय्यक पोलीस व उपनिरीक्षक, १२६ कर्मचारी आणि ४९ होमगार्ड यांच्या सहाय्याने जिल्ह्यात २१ ठिकाणी फिक्स पॉर्इंट, दहा ठिकाणी कोंबींग आॅपरेशन आणि १९ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती.

या आॅपरेशन दरम्यान तब्बल ५६७ वाहने आणि १७१५ प्रवासी यांची तपासणी करण्यात आली. यात बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या ६२ जणांवर तर दारू पिऊन गाडी चालविणाऱ्या ६ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. तसेच कुडाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत अजामीनपात्र वॉरंट बजावत एका आरोपीला अटक करण्यात आली. तर वेंगुर्ला पोलीस ठाण्याच्या हद्दीतही एकावर कारवाई करण्यात आली.या आॅल आऊट आॅपरेशनच्या कालावधीत जिल्ह्यातील फरारी दहा आरोपी, गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे अकरा आणि २५ माहितगार गुन्हेगारांचा शोध घेण्यात आला. जिल्ह्यातील या कारवाईबरोबरच समुद्र किनाऱ्यावरील वेंगुर्ला, मालवण, देवगड आणि रेडी सागरकिनारे तसेच बंदरजेटी यांची तपासणी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलीस विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.कणकवलीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीसिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली हे शहर निवडणुकीसाठी नेहमीच संवेदनशील असते. यावेळी या शहराच्या नगरपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवूू नये, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी खास काळजी घेतली आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गliquor banदारूबंदीPoliceपोलिस