शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गनगरी : शिक्षकांचे वेतन ऑफलाईन देण्याचा सरकारचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 13:36 IST

शालार्थ वेतन प्रणाली तांत्रिक बिघाडामुळे पगार मिळण्यात सतत अडचणी येणाऱ्या शिक्षकांना राज्य सरकारने दिलासा दिला असून, शिक्षकांचे मे व जुलैपर्यतचे वेतन ऑफलाईन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अ‍ॅड. निरंजन डावखरे यांच्या पाठपुराव्यानंतर राज्य सरकारने अध्यादेश जारी केला.

ठळक मुद्दे शिक्षकांचे वेतन ऑफलाईन देण्याचा सरकारचा निर्णयआमदार अ‍ॅड. निरंजन डावखरे यांच्या पाठपुराव्याला यश

सिंधुदुर्गनगरी : शालार्थ वेतन प्रणाली तांत्रिक बिघाडामुळे पगार मिळण्यात सतत अडचणी येणाऱ्या शिक्षकांना राज्य सरकारने दिलासा दिला असून, शिक्षकांचे मे व जुलैपर्यतचे वेतन ऑफलाईन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अ‍ॅड. निरंजन डावखरे यांच्या पाठपुराव्यानंतर राज्य सरकारने अध्यादेश जारी केला. या अध्यादेशानुसार शिक्षकांबरोबरच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे नियमित व थकीत वेतनही ऑफलाईन होणार आहे.राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार ऑनलाईन केले जातात. मात्र, यंदा फेब्रुवारीमध्ये शालार्थ वेतन प्रणालीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे शिक्षकांना वेतन मिळण्यात अडचणी येत होत्या. त्यावर आमदार अ‍ॅड. निरंजन डावखरे यांनी सरकारकडे पाठपुरावा केला होता.

त्यानंतर राज्य सरकारने दोन वेळा खास अध्यादेश काढून ऑफलाईन पद्धतीने पगार देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने शिक्षकांना दिलासा मिळाला. मात्र, शालार्थ वेतन प्रणालीतील तांत्रिक बिघाड पूर्णपणे दूर होईपर्यंत ऑफलाईन वेतन देण्याचा निर्णय घेण्यासाठी आमदार डावखरे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.अखेर आमदार डावखरेंना यश मिळाले असून, राज्य सरकारने सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार ऑफलाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत शालेय शिक्षण विभागाने अध्यादेश जारी केला.

त्यानुसार शालार्थ क्रमांक मिळविण्यास पात्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि शालार्थ क्रमांक मिळूनही आतापर्यंत ऑनलाईन वेतन न मिळालेल्या कर्मचाऱ्यांना आतापर्यंतचे थकीत व जुलै 2018 पर्यंतचे वेतन ऑफलाईन मिळणार आहे.

कोकणातील शिक्षकांना दिलासाकोकणातील ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील हजारो शिक्षकांना ऑफलाईन वेतनाच्या अध्यादेशामुळे दिलासा मिळाला आहे. या अध्यादेशानुसार शालार्थ आयडीच्या प्रतिक्षेत असलेल्यांबरोबरच शालार्थ क्रमांक मिळूनही वेतन न मिळालेल्या शिक्षकांनाही ऑफलाईन पगार मिळणार आहे. केवळ तांत्रिक बाबीमुळे वेतन रखडल्यामुळे शिक्षकांचे हाल होत होते. त्यामुळे आमदार निरंजन डावखरे यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा केला जात होता.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMLAआमदारkonkanकोकण