शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
2
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
3
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
4
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
6
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
7
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
8
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
9
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
10
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
11
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
12
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
13
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
14
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
15
बांगलादेशी खासदाराला अडकविले हाेते हनी ट्रॅपमध्ये; हत्येसाठी मित्रानेच दिली ५ कोटींची सुपारी
16
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
17
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
18
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
19
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
20
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य

सिंधुदुर्ग : संगीत परीक्षा सुरळीत; उद्या लेखी, १३ उमेदवार अनुपस्थित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2018 3:40 PM

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या रिक्त ७१ जागांपैकी बॅन्ड्समन पदासाठी रविवारी संगीत परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी १०६ उमेदवारांना बोलविण्यात आले होते. त्यापैकी ९३ उमेदवारांनी उपस्थित रहात ही परीक्षा दिली असून ते ३ एप्रिल रोजी होणाऱ्या लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. त्यामुळे एकूण १३४७ उमेदवार ३ एप्रिल रोजी होणारी लेखी परीक्षा देणार आहेत.

ठळक मुद्देसंगीत परीक्षा सुरळीत; उद्या लेखी, १३ उमेदवार अनुपस्थित भरतीला पोलीस अधीक्षकांची उपस्थिती

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या रिक्त ७१ जागांपैकी बॅन्ड्समन पदासाठी रविवारी संगीत परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी १०६ उमेदवारांना बोलविण्यात आले होते. त्यापैकी ९३ उमेदवारांनी उपस्थित रहात ही परीक्षा दिली असून ते ३ एप्रिल रोजी होणाऱ्या लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. त्यामुळे एकूण १३४७ उमेदवार ३ एप्रिल रोजी होणारी लेखी परीक्षा देणार आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस विभागाच्या रिक्त होणाऱ्या ७१ पोलीस शिपाई पदांसाठी राज्य शासनाच्या गृहविभागाने पोलीस भरतीचे आयोजन केले होते. या भरतीसाठी सिंधुदुर्गसह राज्यभरातून १० हजार २६९ अर्ज दाखल झाले होते.

१२ मार्च पासून प्रत्यक्ष पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात झाली. यात सुमारे ६ हजार २१८ उमेदवार पुढील फेरीत दाखल झाले होते. त्यानुसार मैदानी गुणांची यादी तयार करून ती प्रसिद्ध करण्यात आली होती.

दरम्यान, लेखी परीक्षेस १:१५ प्रमाणे बॅन्ड्समन पदासाठी १०६ तर पोलीस शिपाई पदासाठी १२४१ पात्र झालेल्या उमेदवारांची सामाजिक व समांतर आरक्षण यादी (कट आॅफ लिस्टसह) सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. बॅन्ड्समनसाठी ८० गुणांची कट आॅफ लिस्ट लावण्यात आली आहे.मैदानी चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांमधून कट आॅफ लिस्टनुसार आणि संगीत वाद्य परीक्षा दिलेले उमेदवार असे मिळून एकूण १३४७ उमेदवारांची पोलीस शिपाई पदासाठी लेखी परीक्षेसाठी निवड करण्यात आली आहे.

या १३४७ उमेदवारांची लेखी परीक्षा ३ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता येथील पोलीस कवायत मैदानावर होणार आहे. लेखी परीक्षेसाठी येताना शारीरिक चाचणीवेळी देण्यात आलेले ओळखपत्र, लेखी परीक्षेसाठी पॅड, काळ्या शाईचे बॉलपेन, दोन पासपोर्ट साईज फोटो, त्यासोबत विद्यालय किंवा महाविद्यालयाचे ओळखपत्र, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र यापैकी एक ओळखपत्र आणावे, असे आवाहन पोलीस भरती समन्वयक हेमंतकुमार शहा यांनी केले आहे.

९३ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्रमैदानी परीक्षेत पात्र ठरलेल्या बॅन्ड्समन उमेदवारांची संगीत परीक्षा १ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता येथील पोलीस कवायत मैदानावर पार पडली. ही प्रात्यक्षिक संगीत परीक्षा बॅन्ड तज्ञ अधिकाऱ्यांच्या निवड समितीने घेतली. या परीक्षेसाठी बोलविण्यात आलेल्या १०६ उमेदवारांपैकी ९३ उमेदवार उपस्थित राहत त्यांनी ही परीक्षा दिली. हे ९३ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गpolice parade groundपोलिस कवायत मैदान