सिंधुदुर्ग : नगरपालिका कर्मचाऱ्यांचे आंदोलन, कामकाज सुरू : सावंतवाडीतून पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 16:07 IST2018-12-18T16:05:56+5:302018-12-18T16:07:02+5:30
राज्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतीमधील कर्मचारी, संवर्ग कर्मचारी, सफाई कामगार व इतर कर्मचारी यांच्या विविध मागण्यांसंदर्भात राज्यस्तरीय कर्मचारी संघटनेच्यावतीने पुकारण्यात आलेल्या धरणे आंदोलनात पालिका कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

सिंधुदुर्ग : नगरपालिका कर्मचाऱ्यांचे आंदोलन, कामकाज सुरू : सावंतवाडीतून पाठिंबा
सावंतवाडी : राज्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतीमधील कर्मचारी, संवर्ग कर्मचारी, सफाई कामगार व इतर कर्मचारी यांच्या विविध मागण्यांसंदर्भात राज्यस्तरीय कर्मचारी संघटनेच्यावतीने पुकारण्यात आलेल्या धरणे आंदोलनात पालिका कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
यावेळी कामकाज मात्र सुरु ठेवण्यात आले होते. नगरपालिका एकजुटीचा विजय असो, हम सब कर्मचारी साथ है, सावंतवाडी नगरपालिका कर्मचारी संघटनेचा विजय असो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
१ जानेवारी २०१६ पासून विनाअट सातवा वेतन आयोग लागू करणे, १९९३ पूर्वीचे तसेच २००० पूर्वीचे सर्व रोजंदारी कर्मचारी ३१ डिसेंबरपूर्वी कायम करणे अशा विविध ११ मागण्यांसाठी हे राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात आले.
राज्यातील पालिका व नगरपंचायतीमधील कार्यरत असलेल्या संवर्ग, कंत्राटी, रोजंदारी, अनुकंपाधारक अशा विविध कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी वेळोवेळी आंदोलने छेडण्यात आली. तसेच त्याचा पाठपुरावा करण्यात आला. मात्र शासनाकडून दुर्लक्ष करुन मागण्यांची पूर्तता करण्यात आली नाही. दरम्यान, पालिका कर्मचाऱ्यांनी पालिकेसमोर एकत्र येत जोरदार घोषणाबाजी दिली.
यावेळी पालिका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष देवीदास आडारकर, शिवप्रसाद कुडपकर, दीपक म्हापसेकर, सुनील कुडतरकर, विजय बांदेकर, विठ्ठल मालंडकर, टी. पी. जाधव, विनोद सावंत, ड्युमिंग आल्मेडा, परवीन शेख, आसावरी केळबाईकर व इतर संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.