शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
5
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
9
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
11
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
12
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
13
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
14
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
15
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
16
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
17
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
18
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
19
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
20
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड

सिंधुदुर्ग : बांदा नट वाचनालयात अवतरला कालिदासाचा मेघदूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 14:01 IST

बांदा येथील नट वाचनालयात स्वरचित काव्यवाचन संमेलनाला काव्य रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या संमेलनाच्या निमित्ताने वाचनालयात कालिदासाचा मेघदूत अवतरल्याची प्रतिक्रिया रसिकांनी व्यक्त केली. संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध मालवणी कवी दादा मडकईकर उपस्थित होते.

ठळक मुद्देबांदा नट वाचनालयात अवतरला कालिदासाचा मेघदूतपावसाळी कवी संमेलनात रसिक मंत्रमुग्ध, उत्स्फूर्त प्रतिसाद

बांदा : बांदा येथील नट वाचनालयात स्वरचित काव्यवाचन संमेलनाला काव्य रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या संमेलनाच्या निमित्ताने वाचनालयात कालिदासाचा मेघदूत अवतरल्याची प्रतिक्रिया रसिकांनी व्यक्त केली. संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध मालवणी कवी दादा मडकईकर उपस्थित होते.

यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष एस. आर. सावंत, उपाध्यक्ष सुभाष मोर्ये, संचालक प्रकाश पाणदरे, कविवर्य भास्कर पावसकर, मळगाव वाचनालयाचे संस्थापक कार्यवाह महेश खानोलकर उपस्थित होते.या संमेलनात नवोदित कवींनी स्वरचित पावसाळी कविता वाचून व गाऊन दाखविल्या. विमल गवस यांच्या पावसात थोडे भिजून घ्या या कवितेने कवी संमेलनाची सुरुवात केली. प्रसिद्ध कवी रामचंद्र शिरोडकर यांनी पावसपाणी पडान जावने ही कविता गाऊन दाखवली. सचला आरोलकर यांनी आषाढस्य प्रथम दिवसे हे कालिदासांचे महाकाव्य आणि मेघदूतबद्दल सविस्तर माहिती दिली व आपली स्वरचित पाऊस ही कविता सादर केली.त्यानंतर शुभेच्छा सावंत यांनी पाऊस आला रे आला, निशांत नाईक यांनी उन्हाळो संपान पावस ईलो, गणेश गर्दे यांनी चिंब भिजल्या पावसाने आणि या हो या हो पाऊस राया या कविता सादर केल्या.जय भोसले यांनी ओल्या मातीचो वास ही मालवणी कविता सादर केली. अनंत भाटे यांनी पावसाळ्यामुळे वातावरणात होणाऱ्या बदलांवर पाऊस धडाडला पाऊस कडाडला ही कविता सादर केली.

जे. डी. पाटील यांनी पावसाचे थेंब तर विमल तारी यांनी जमिनीला आली जाग ही कविता सादर केली. अर्चना सावंत यांनी पावस इलो पावस इलो, डॉ. आशा रेगे यांनी पावसावर तर आशुतोष भांगले यांनी कवी मडकईकरांवर चारोळी सादर केली.यावेळी सरिता मडकईकर, संचालक जगन्नाथ सातोस्कर, सुधीर साटेलकर, स्वप्निता सावंत, गुरुनाथ नार्वेकर, उज्ज्वला नार्वेकर, बच्चू कनयाळकर, सचिन चांदेकर, अमिता मुंगी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यवाह राकेश केसरकर यांनी, आभार सहकार्यवाह हेमंत मोर्ये यांनी मानले. या कवी संमेलनाला काव्य रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

विनोदी शैलीने रसिकांची मने जिंकलीकवी दादा मडकईकर यांनी तू पावस मी पावस या कवितेने कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर सुक्या मनार पानापानार, मिरग, सासयेची माया, तारया मामा तारया मामा होडी हाड रे, चांदण्याची फुला, शालग्या जाळवानदारीण अशा अनेक कविता आपल्या विनोदी शैलीत सादर करून रसिकांची मने जिंकली. यावेळी हार्मोनियम गौरांग भांगले व आशुतोष भांगले तर तबला साथ संगत राजू परब यांनी केली.यावेळी कवी भास्कर पावसकर यांनी कालिदासाच्या मेघदूताचे वर्णन करून हा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगितले आणि आपली पहिला पाऊस ही कविता सादर केली. या कार्यक्रमात दहावी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या रोशन मोरजकर याचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

टॅग्स :Monsoon Specialमानसून स्पेशलsindhudurgसिंधुदुर्ग