मालवण : गोवा येथील रुग्णालयातून देवबागच्या दिशेने मृतदेह घेऊन येत असताना कुंभारमाठ सागरी महामार्गानजीकच्या जुन्या खाणीत सुमारे २० फूट खोल पडून कारला भीषण अपघात झाला. यात कारचालक सुनील रघुनाथ मसुरकर (३६, रा. शिरोडा) याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली तर गाडीतील इतर तिघांनाही दुखापत झाली. हा अपघात शनिवारी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडला.देवबाग येथील पुरुषोत्तम शंभू राऊळ (७०) यांच्यावर गोवा येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी मध्यरात्री त्यांचे निधन झाले. त्यामुळे त्यांचा मृतदेह मालवण देवबाग येथे कारमधून आणण्यात येत होता. यावेळी कारमध्ये मृत पुरुषोत्तम राऊळ यांची पत्नी सुनंदा पुरुषोत्तम राऊळ (६५), मुलगी रोहिणी राकेश खोबरेकर (३८, रा. शिरोडा), जावई राकेश खोबरेकर (४०, रा. शिरोडा) यांचा समावेश होता. तर चालक सुनील रघुनाथ मसुरकर हा कार चालवित होता.शनिवारी पहाटे देवली सागरी महामार्गावरून कुंभारमाठच्या दिशेने येत असताना सागरी महामार्गावरून कुंभारमाठ येथील मुख्य रस्त्यावर वळण घेत असताना अचानक चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी थेट कुंभारमाठ मुख्य रस्त्याच्या पलीकडे असणाऱ्या जुन्या खाणीत कोसळली. हा अपघात एवढा भीषण होता की गाडी थेट खाणीत कोसळल्याने गाडीचा अक्षरश: चेंदामेंदा झाला.या अपघातात चालक सुनील मसुरकर यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. सुनंदा राऊळ यांचा पाय फ्रॅक्चर झाला. तसेच रोहिणी खोबरेकर व राकेश खोबरेकर यांनाही दुखापत झाली. चालक सुनील मसुरकर याला झोप अनावर झाल्याने त्याचा गाडीवरील ताबा सुटून अपघात घडला अशी चर्चा कुंभारमाठ परिसरात सुरू होती.गाडी थेट खाणीत, जखमींना ओरोसला हलविलेगाडी थेट खाणीत कोसळल्याचे पाहून स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत सर्व जखमींना गाडीतून बाहेर काढून रुग्णवाहिकेतून मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.मात्र चालक सुनील मसुरकर, सुनंदा राऊळ व रोहिणी खोबरेकर यांची दुखापत गंभीर असल्याने त्यांना प्राथमिक उपचारानंतर तातडीने ओरोस येथे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. या अपघाताची सायंकाळी उशिरा मालवण पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली.या प्रकरणी चालक सुनील मसुरकर याच्यावर अविचाराने व हयगयीने गाडी चालवून अपघातास व दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.
सिंधुदुर्ग : कुंभारमाठ येथे कारला अपघात, चालक गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 13:45 IST
गोवा येथील रुग्णालयातून देवबागच्या दिशेने मृतदेह घेऊन येत असताना कुंभारमाठ सागरी महामार्गानजीकच्या जुन्या खाणीत सुमारे २० फूट खोल पडून कारला भीषण अपघात झाला. यात कारचालक सुनील रघुनाथ मसुरकर (३६, रा. शिरोडा) याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली तर गाडीतील इतर तिघांनाही दुखापत झाली. हा अपघात शनिवारी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडला.
सिंधुदुर्ग : कुंभारमाठ येथे कारला अपघात, चालक गंभीर जखमी
ठळक मुद्देकुंभारमाठ येथे कारला अपघात, चालक गंभीर जखमी गोवा येथून देवबागच्या दिशेने मृतदेह नेत असताना दुर्घटना