सिंधुदुर्ग : कणकवली शिवसेना उपशहरप्रमुखाच्या दोन गाड्या अज्ञाताने फोडल्या, कणकवली शहरात खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 13:24 IST2018-01-12T13:19:34+5:302018-01-12T13:24:18+5:30
शिवसेना कणकवली उपशहरप्रमुख प्रमोद मसुरकर यांच्या दोन गाड्यांची अज्ञाताकडून तोडफोड करण्यात आली आहे. मसुरकर राहत असलेल्या पमाज सिटीसेंटर या बिल्डिंगसमोर लावण्यात आलेल्या फोक्सवॅगन आणि बोलेरो गाड्यांच्या दर्शनी काचा दगड मारून अज्ञाताने फोडल्या आहेत. त्यामुळे कणकवली शहरात खळबळ उडाली आहे.

कणकवली येथे प्रमोद मसुरकर यांच्या दोन गाड्या अज्ञाताने फोडल्या.
कणकवली : शिवसेना कणकवली उपशहरप्रमुख प्रमोद मसुरकर यांच्या दोन गाड्यांची अज्ञाताकडून तोडफोड करण्यात आली आहे. मसुरकर राहत असलेल्या पमाज सिटीसेंटर या बिल्डिंगसमोर लावण्यात आलेल्या फोक्सवॅगन आणि बोलेरो गाड्यांच्या दर्शनी काचा दगड मारून अज्ञाताने फोडल्या आहेत. त्यामुळे कणकवली शहरात खळबळ उडाली आहे.
गुरुवारी मध्यरात्री १ वाजल्यानंतर गाड्या फोडल्याची शक्यता प्रमोद मसुरकर यांनी वर्तविली आहे.
दरम्यान, या हल्ल्याची शिवसेनेने गंभीर दखल घेतली आहे.
शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, तालुकाप्रमुख सचिन सावंत, कणकवली विधानसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख शैलेश भोगले, युवासेना जिल्हाध्यक्ष हर्षद गावडे यांनी प्रमोद मसुरकर यांच्या निवासस्थानी जात घटनेची माहिती घेतली.
यावेळी नगरसेवक सुशांत नाईक, शहरप्रमुख शेखर राणे, सुजित जाधव आदी शिवसैनिक उपस्थित होते.
प्रमोद मसुरकर यांनी गाड्या फोडल्याच्या घटनेची पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.