शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

सिंधुदुर्ग : लोकराज्य विशेषांक पोलिसांसाठी प्रेरणादायी, प्रकाश गायकवाड : सायबर गुन्हे, सुरक्षिततेबाबत मोलाची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 14:00 IST

माहिती व जनसंपर्क विभागामार्फत प्रकाशित होणारा जानेवारी महिन्याचा लोकराज्यचा अंक पोलीस विभागाची कार्यप्रणाली व सविस्तर माहिती देणारा अंक आहे. हा लोकराज्य पोलीस विशेषांक पोलीस दलाला प्रेरणादायी ठरेल, असे गौरवोद्गार जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड यांनी येथे काढले. ​​​​​​​

ठळक मुद्देलोकराज्य विशेषांक पोलिसांसाठी प्रेरणादायी : प्रकाश गायकवाडसायबर गुन्हे, सुरक्षिततेबाबत मोलाची माहिती

सिंधुदुर्गनगरी : माहिती व जनसंपर्क विभागामार्फत प्रकाशित होणारा जानेवारी महिन्याचा लोकराज्यचा अंक पोलीस विभागाची कार्यप्रणाली व सविस्तर माहिती देणारा अंक आहे. हा लोकराज्य पोलीस विशेषांक पोलीस दलाला प्रेरणादायी ठरेल, असे गौरवोद्गार जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड यांनी येथे काढले.सायबर गुन्हे आणि सायबर सुरक्षा या विषयांवर या अंकामध्ये मोलाची माहिती पुरविण्यात आली आहे. नागरिकांनी पोलीस आपल्या सुरक्षेसाठी कसे तत्पर असतात आणि त्यांची कार्यपद्धती कशी चालते हे जाणून घेण्यासाठी हा अंक नक्की वाचावा. तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनीही लोकराज्य या मासिकाचे जास्तीत जास्त वर्गणीदार व्हावे, असे आवाहन गायकवाड यांनी केले.

लोकराज्य पोलीस विशेषांक या जानेवारी महिन्याच्या अंकाचे अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते मंगळवारी प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या अंकामध्ये पोलीस दलाची माहिती देण्यात आली आहे. तसेच पोलिसांचे कार्य विभाग, त्यांचे संपर्क क्रमांक, दक्षता विभाग आणि तातडीच्या प्रसंगी करावयाच्या संपर्क क्रमांकांचाही या अंकामध्ये समावेश आहे.

 याशिवाय गुन्ह्यांची उकल करण्यासाठी तंत्रज्ञानाचा होणारा वापर आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी स्थापन करण्यात आलेले पोलिसांचे विशेष विभाग यांचीही माहिती या अंकामध्ये देण्यात आली आहे.

जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करताना, पोलीस दलाच्या कार्याचे कौतुक केले. तसेच रेल्वे पोलिसांनी आतापर्यंत पाच हजार मुले व तीन हजार हरवलेल्या मुलींची त्यांच्या पालकांशी भेट घडवून आणल्याचेही बांदिवडेकर यांनी सांगितले.राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये यश प्राप्त केलेल्या खेळाडूंसोबत पोलीस दलाच्या क्रीडा विभागाचे प्रमुख एस. बी. डिचोलकर यांच्यासह एस. जे. पाटील, एस. जी. चिपकर, आर. बी. केरेखोलकर, एस. एस. सावंत यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.पोलीस क्रीडा स्पर्धेतील खेळाडूंचा सत्कारदरम्यान, यावेळी राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धांमध्ये यश प्राप्त केलेल्या खेळाडूंचा अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यामध्ये क्रीडा क्षेत्रात जिल्हा पोलीस दलाचे नाव उंचावणाऱ्या राहुल काळे यांचाही समावेश आहे.

राहुल काळे यांनी शंभर, दोनशे आणि चारशे रिले या स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. या सोबत सोहित आहिर, बसवराज कुंडगोळ आणि भक्ती शिवलकर या पदक विजेत्यांचाही सत्कार करण्यात आला