lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > बीएसईत सायबर सुरक्षा संचालन केंद्र उभारणार

बीएसईत सायबर सुरक्षा संचालन केंद्र उभारणार

मुंबई शेअर बाजाराने (बीएसई) सायबर सुरक्षा संचालन केंद्र (एसओसी) उभारण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी सॉफ्टवेअर क्षेत्रातील आघाडीची कंपनी आयबीएमची निवड केली आहे.

By admin | Published: May 13, 2017 12:14 AM2017-05-13T00:14:36+5:302017-05-13T00:14:36+5:30

मुंबई शेअर बाजाराने (बीएसई) सायबर सुरक्षा संचालन केंद्र (एसओसी) उभारण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी सॉफ्टवेअर क्षेत्रातील आघाडीची कंपनी आयबीएमची निवड केली आहे.

Cyber ​​Security Operation Center to be set up on BSE | बीएसईत सायबर सुरक्षा संचालन केंद्र उभारणार

बीएसईत सायबर सुरक्षा संचालन केंद्र उभारणार

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई शेअर बाजाराने (बीएसई) सायबर सुरक्षा संचालन केंद्र (एसओसी) उभारण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी सॉफ्टवेअर क्षेत्रातील आघाडीची कंपनी आयबीएमची निवड केली आहे.
नव्या काळातील आॅनलाईन धोके दूर ठेवणे, सायबर सुरक्षा अधिक मजबूत करणे आणि समभागधारकांच्या मालमत्तांचे संरक्षण करणे या उद्देशाने बीएसई हे केंद्र उभारत आहे. हे केंद्र पूर्णत: अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असेल. आयबीएमच्या मदतीने त्याची उभारणी करण्यात येईल.
बीएसई आणि आयबीएम यांच्यात पाच वर्षांचा सुरक्षा करार झाला आहे. त्यानुसार हे केंद्र शेअर बाजारातील हालचालींवर चोवीस तास निगराणी ठेवण्याचे काम करील.
आयबीएम सेक्युरिटी सर्व्हिसेसचे व्यवसाय कक्ष कार्यकारी संदीप सिन्हा रॉय यांनी सांगितले की, ‘बीएसईसोबत भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. आम्ही बीएसईला सर्वोत्तम दर्जाची सुरक्षाव्यवस्था, विश्लेषणासाठी एकात्मिक यंत्रणा, संज्ञात्मक आणि वास्तवकालीन संरक्षण व्यवस्था देऊ.’

Web Title: Cyber ​​Security Operation Center to be set up on BSE

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.