शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : तिहेरी अपघातात दोघे गंभीर, साळेल-नांगरभाट येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 16:40 IST

मालवण-कसाल राज्यमार्गावरील साळेल-नांगरभाट येथे एसटी, डंपर व दुचाकी यांच्यात तिहेरी अपघात झाला. या अपघातात दुचाकीच्या मागे बसलेला अनिकेत मेस्त्री (२६, रा. नांदोस) याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. त्याची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्याला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

ठळक मुद्देतिहेरी अपघातात दोघे गंभीर, साळेल-नांगरभाट येथील घटनाजखमींना जिल्हा रुग्णालयात हलविले

मालवण : मालवण-कसाल राज्यमार्गावरील साळेल-नांगरभाट येथे एसटी, डंपर व दुचाकी यांच्यात तिहेरी अपघात झाला. या अपघातात दुचाकीच्या मागे बसलेला अनिकेत मेस्त्री (२६, रा. नांदोस) याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. त्याची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्याला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दुचाकीचालक द्वारकानाथ भोगले (२५, रा. मडुरा-सावंतवाडी) यालाही गंभीर दुखापत झाली आहे. हा अपघात दुपारी तीन वाजता घडला.मालवण एसटी आगाराची कसाल-मालवण बसफेरी घेऊन विजय केळुसकर हे दुपारी मालवणच्या दिशेने येत होते. याचवेळी हिवाळे येथून दत्ता सामंत यांच्या मालकीचा डंपर चिपीच्या दिशेने खडी घेऊन जात होता.यावेळी साळेल नांगरभाट येथील रस्त्यावर एसटी चालकाने डंपरला ओव्हरटेक करून पुढे जाण्याचा प्रयत्न केला असता त्याचवेळी मालवणहून कसालच्या दिशेने जाणारी दुचाकी समोर आली. एसटी चालकाने त्यांना वाचविण्यासाठी रस्त्याच्या कडेला जाण्याचा प्रयत्न केला. मात्र एसटीचालक व दुचाकीचालक या दोघांनाही गाडीवर नियंत्रण मिळविता आले नाही. त्यामुळे दुचाकीची एसटीस पुढील बाजूस जोरदार धडक बसली.याचदरम्यान पाठीमागून येणाऱ्या डंपरने एसटी बसला मागाहून धडक दिली. त्यामुळे एसटीचेही नुकसान झाले.या अपघाताची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी सुनील वेंगुर्लेकर, अमोल महाडिक, महिला पोलीस गंगा येडगे, दीक्षा गोसावी आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या अपघाताची नोंद येथील पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.अनिकेतची प्रकृती चिंताजनकअपघातात दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर फेकले गेले. यातील दुचाकीच्या पाठीमागे बसलेल्या अनिकेत मेस्त्री याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली, तर चालक द्वारकानाथ भोगले यालाही गंभीर दुखापत झाली. गंभीर जखमी झालेल्या दोघांनाही तत्काळ चौके येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलविण्यात आले. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पोळ यांनी त्यांच्यावर उपचार केले. यातील अनिकेत मेस्त्री याची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्याला १०८ रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. 

टॅग्स :Accidentअपघातsindhudurgसिंधुदुर्ग