शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : स्वतंत्र कोकण विद्यापीठ न झाल्यास आंदोलन :  महेंद्र नाटेकर यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 14:11 IST

रत्नागिरी येथे स्वतंत्र कोकण विद्यापीठ स्थापन करण्यात यावे. येत्या दोन महिन्यात याबाबत कार्यवाही नाही झाली तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यातील विद्यार्थी, पालकांसह स्वतंत्र कोकण राज्य निर्मिती संघटना मुंबई - गोवा महामार्गावर तीव्र आंदोलन करेल.असा इशारा प्रा. महेंद्र नाटेकर यांनी शासनाला दिला आहे.

ठळक मुद्देस्वतंत्र कोकण विद्यापीठ न झाल्यास आंदोलन महेंद्र नाटेकर यांचा कणकवलीतील सभेत इशारा

कणकवली : सुमारे सात लाख विद्यार्थी असलेल्या मुंबई विद्यापीठात अनागोंदी कारभार चालला आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य उध्वस्त होत आहे. यासाठी रत्नागिरी येथे स्वतंत्र कोकणविद्यापीठ स्थापन करण्यात यावे. येत्या दोन महिन्यात याबाबत कार्यवाही नाही झाली तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यातील विद्यार्थी, पालकांसह स्वतंत्र कोकण राज्य निर्मिती संघटना मुंबई - गोवा महामार्गावर तीव्र आंदोलन करेल, असा इशारा प्रा. महेंद्र नाटेकर यांनी शासनाला दिला आहे.याबाबत प्रसिध्दिस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कणकवली येथील स्वतंत्र कोकण राज्य निर्मिती संघटनेच्या कार्यालयात सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रा. नाटेकर बोलत होते.यावेळी मोतीराम गोठिवरेकर, ए.आय.चिलवान, प्रा.सुभाष गोवेकर, दिलीप लाड, जे.जे.दळवी , वाय. जी.राणे, रमेश सावंत आदी उपस्थित होते.प्रा. नाटेकर पुढे म्हणाले, मुंबई विद्यापीठात पदवी प्रमाणपत्रे व गुणपत्रिका हजारो रूपये घेऊन विकल्या जात आहेत. विद्यापीठाच्या बेजबाबदार कारभारामुळे लाखो विद्यार्थ्याना अकारण अनुतीर्ण केले जात आहे.

बनावट गुणपत्रिका व प्रमाणपत्रांचा घोटाळा गाजत असताना केटी लागलेल्या एका विद्यार्थिनीची दीड वर्ष उत्तरपत्रिका न तपासल्याने तीने सर्वोच्च न्यायालयात विद्यापीठाला खेचले आहे. ही गंभीर बाब आहे.कोकणा बरोबरच संपूर्ण भारतातील तसेच परदेशातील विद्यार्थी मुंबई विद्यापीठात प्रवेश घेतात. फोर्ट, कालिना व रत्नागिरी अशी तिन केंद्रे आहेत. हा सर्व व्याप एका कुलगुरुने सांभाळणे केवळ अशक्य आहे. त्यामुळे भ्रष्टाचार फोफावला आहे. रत्नागिरी येथील उपकेंद्रात चाळीस विद्यार्थ्यांना एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने आपल्या सही , शिक्क्यानिशी काही हजारात गुणपत्रिका विकल्याचे समोर आले आहे.त्यातील सहा जणाना अटक करण्यात आली. दरवर्षी परीक्षेच्या वेळापत्रकात घोळ घातलेला असतो. प्रश्न पत्रिकेत असंख्य चुका असतात. मूल्य मापनाबरोबरच पुनर्मूल्यमापनात चुका असतात. निकाल वेळच्या वेळी लागत नाहीत. यावर्षी अनेक विद्यार्थी चुकून नापास केल्याचे समोर आले आहे. हा विद्यार्थ्यांच्या जीवनाशीच खेळ आहे. ही सर्व भयावह परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने रत्नागिरी येथे स्वतंत्र कोकण विद्यापीठ निर्मिती करण्याचा निर्णय त्वरीत जाहिर करावा. तसेच त्याची कार्यवाही करावी. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल. असेही प्रा. नाटेकर यांनी यावेळी जाहिर केले. इतर उपस्थित सदस्यानी त्याला दुजोरा दिला. तसेच आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार केला. असेही या पत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :konkanकोकणuniversityविद्यापीठsindhudurgसिंधुदुर्ग