शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : सावरवाडी येथील संजू परब यांच्या उपोषणाला मोठी उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 14:10 IST

सुंदरवाडी महोत्सवात सहाय्यक पोलीस निरीक्षक अरूण जाधव यांनी कलाकारांना दिलेल्या अपमानास्पद वागणुकीच्या निषेधार्थ कलंबिस्त येथून सुरू झालेले साखळी उपोषण सावरवाड येथे करण्यात आले. यावेळीही ग्रामस्थांसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अखेर सायंकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी दयानंद गवस यांच्यावतीने सावंतवाडी पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांनी ग्रामस्थांसह महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष संजू परब यांची भेट घेऊन याप्रकरणी चौकशी होईपर्यंत उपोषण स्थगित ठेवण्याचे आवाहन केले. याला परब यांनीही पाठिंबा दिला आहे.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग : सावरवाडी येथील संजू परब यांच्या उपोषणाला मोठी उपस्थितीचौकशी होईपर्यंत उपोषण स्थगित ठेवावे, पोलिसांचे आवाहन सावरवाड येथील उपोषणात पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी

सावंतवाडी : सुंदरवाडी महोत्सवात सहाय्यक पोलीस निरीक्षक अरूण जाधव यांनी कलाकारांना दिलेल्या अपमानास्पद वागणुकीच्या निषेधार्थ कलंबिस्त येथून सुरू झालेले साखळी उपोषण सावरवाड येथे करण्यात आले. यावेळीही ग्रामस्थांसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अखेर सायंकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी दयानंद गवस यांच्यावतीने सावंतवाडी पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांनी ग्रामस्थांसह महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष संजू परब यांची भेट घेऊन याप्रकरणी चौकशी होईपर्यंत उपोषण स्थगित ठेवण्याचे आवाहन केले. याला परब यांनीही पाठिंबा दिला आहे.

महाराष्ट्र स्वाभिमानच्यावतीने आयोजित केलेल्या सुंदरवाडी महोत्सवासाठी आलेल्या कलाकारांना सावंतवाडी पोलिसांनी ज्या हॉटेलमध्ये कलाकार उतरले होते तेथे तपासणीच्यावेळी अपमानास्पद वागणूक दिली असा आरोप केला आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक अरूण जाधव यांची बदली करावी, तोपर्यंत आम्ही प्रत्येक गावात साखळी उपोषणे करणार, असा इशारा स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष संजू परब यांनी दिला होता.

१० मार्चला कलंबिस्त येथे, तर सावरवाड येथे रविवारी उपोषण करण्यात आले. या उपोषणात तालुकाध्यक्ष संजू परब यांच्यासह सभापती रवींद्र मडगावकर, गुरू मठकर, किरण सावंत, माजी जिल्हा परिषद सदस्य पंढरी राऊळ, अंतोन रॉड्रिक्स आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.या समितीचा अहवाल येत्या पंधरा दिवसांत पोलीस अधीक्षकांना प्राप्त होणार आहे. त्यामुळे उपअधीक्षकांच्यावतीने आम्ही आलो असून, चौकशी होईपर्यंत उपोषण स्थगित ठेवा, असे अवाहन पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांनी केले. त्यानंतर उपोषणकर्त्यांसह संजू परब यांनी पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पुढील कारवाई होईपर्यंत उपोषण स्थगित ठेवत असल्याचे जाहीर केले. यावेळी पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांच्यासोबत पोलीस कर्मचारी दाजी सावंत, अमोद सरगले आदी उपस्थित होते.सावरवाड येथील उपोषणात पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजीयावेळी पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी महिलांची संख्या मोठी होती. सायंकाळच्या सुमारास पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांच्यासह पोलीस सावरवाड येथे दाखल झाले. त्यांनी उपोषणस्थळी जाऊन तालुकाध्यक्ष संजू परब यांची भेट घेतली. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. घटना घडल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी सावंतवाडी उपविभागीय अधिकारी दयानंद गवस यांची चौकशी समिती नेमली आहे.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गPoliceपोलिस