शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : आयटीआयच्या शिपायावर फसवणुकीचा गुन्हा दाखल, संस्थेच्या प्राचार्यांनी दिली तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 16:31 IST

बनावट वेतनचिठ्ठी व बोगस प्रमाणपत्र तयार करून शासन, बँक आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांची फसवणूक केल्याप्रकरणी प्रशिक्षण संस्थेचे शिपाई राजन तुकाराम कदम याच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डी. बी. चौगुले यांच्या तक्रारीवरून कदम याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

ठळक मुद्देआयटीआयच्या शिपायावर फसवणुकीचा गुन्हा दाखलसंस्थेच्या प्राचार्यांनी दिली तक्रार बनावट वेतनचिठ्ठी, बोगस प्रमाणपत्र बनविले

वैभववाडी : बनावट वेतनचिठ्ठी व बोगस प्रमाणपत्र तयार करून शासन, बँक आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांची फसवणूक केल्याप्रकरणी प्रशिक्षण संस्थेचे शिपाई राजन तुकाराम कदम याच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डी. बी. चौगुले यांच्या तक्रारीवरून कदम याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपी राजन कदम हा एडगाव येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत चतुर्थश्रेणी कर्मचारी आहे. त्याने प्रशिक्षण संस्थेत अस्तित्वात नसलेल्या अभ्यासक्रमाचे बोगस प्रमाणपत्र बनवून त्यावर प्राचार्यांचा शिक्का व खोटी स्वाक्षरी करून ते ओझरम (ता. कणकवली) येथील युवकाला दिले.

तसेच रजा कालावधीतील बनावट वेतनचिठ्ठी बनवून वैभववाडी शहरातील तीन लोकांना तो कर्जासाठी जामीन राहिल्याचे आरोप कदमवर ठेवण्यात आले आहेत.औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य चौगुले यांच्या तक्रारीनुसार येथील प्रशिक्षण संस्थेत ह्यप्लंबरह्ण (नळ कारागीर) हा अभ्यासक्रम उपलब्ध नाही. तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र दिल्लीतील एन.सी.व्ही.टी संस्थेमार्फत दिले जाते.

मात्र, ओझरम येथील विराज रवींद्र राणे या युवकाने आॅगस्ट २०१६ ते जुलै २०१७ या कालावधीत प्लंबर अभ्यासक्रम पूर्ण करून तो उत्तीर्ण झाला असे बोगस प्रमाणपत्र संशयित आरोपी राजन कदम याने बनविले. त्यावर प्राचार्यांचा शिक्का मारून त्यांची खोटी स्वाक्षरी केली व ते प्रमाणपत्र कदम याने विराज राणेला दिले.परंतु, विराज राणे नोकरीसाठी परदेशी जाणार असल्याने १ एप्रिलला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आला. त्याने मराठीतील प्लंबर अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र इंग्रजीत रुपांतरीत करून देण्याची मागणी केली. त्यावेळी बोगस प्रमाणपत्राचा धक्कादायक प्रकार उघड झाला.

विशेष म्हणजे प्रशिक्षण संस्थेत विराज राणेचा प्रवेशच नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर ५ एप्रिलला युनियन बँकेच्या फोंडाघाट शाखेचे कर्मचारी राजन कदम याला शोधत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आले. त्यामुळे बनावट वेतनचिठ्ठीचा प्रकार उघड झाला.संशयित आरोपी राजन कदम हा २३ जानेवारी २०१७ ते १५ जुलै २०१७ या कालावधीत असाधारण रजेवर होता. त्या दरम्यान जून २०१७ ची बनावट वेतनचिठ्ठी बनवून तो युनियन बँकेच्या फोंडाघाट शाखेत वैभववाडी शहरातील तिघांना कर्जासाठी जामीन राहिला आहे.

त्या कर्जदारांचे हप्ते थकित राहिल्यामुळे बँकेचे कर्मचारी जामीनदार राजन कदमच्या शोधात प्रशिक्षण संस्थेत आले. त्यामुळेच कदम याने दोन प्रकरणात शासन, बँक आणि आपली फसवणूक केल्याची तक्रार प्राचार्य डी. बी. चौगुले यांनी दिली आहे.

चौगुले यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी संशयित आरोपी तथा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा शिपाई राजन कदम याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला असून पोलीस उपनिरीक्षक जयश्री भोमकर या गुन्ह्याचा तपास करीत आहेत. दरम्यान, सायंकाळी उशिरापर्यंत कदम याला अटक झाली नव्हती.

आणखीही बोगस प्रमाणपत्रे, शक्यतांचा तपास होणे आवश्यकऔद्योगिक प्रशिक्षण संस्थेत येथे उपलब्ध नसलेल्या अभ्यासक्रमाचे बोगस प्रमाणपत्र तयार करून दिल्याचे उघड झाल्याने प्रशिक्षण संस्थेच्या कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे यापूर्वी आणखीही अशाच प्रकारची विविध अभ्यासक्रमांची बोगस प्रमाणपत्रे बनवून दिली असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या अनुषंगाने शक्यतांचा तपास होणे आवश्यक आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrimeगुन्हाPoliceपोलिसfraudधोकेबाजी