शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

सिंधुदुर्ग : अखेर वाळू लिलावाला सापडला मुहूर्त, तब्बल तीन महिन्यानंतर प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 13:01 IST

वाळू लिलाव प्रक्रियेला यावेळी उशीर झाल्याने कुडाळ तालुका डंपर चालक-मालक संघाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डंपर आंदोलन सुरु केले होते. या आंदोलनानंतर जागे झालेल्या जिल्हा प्रशासनाने तब्बल तिन महिने रखडलेले वाळू लिलाव प्रक्रिया तत्काळ जाहीर केली आहे.

ठळक मुद्देअखेर वाळू लिलावाला सापडला मुहूर्ततब्बल तीन महिन्यानंतर आंदोलनानंतर प्रशासनाला जाग

सिंधुदुर्गनगरी : वाळू लिलाव प्रक्रियेला यावेळी उशीर झाल्याने कुडाळ तालुका डंपर चालक-मालक संघाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डंपर आंदोलन सुरु केले होते. या आंदोलनानंतर जागे झालेल्या जिल्हा प्रशासनाने तब्बल तिन महिने रखडलेले वाळू लिलाव प्रक्रिया तत्काळ जाहीर केली आहे.जिल्ह्यात दरवर्षी आॅक्टोबर महिन्यात खाडिपात्रातील साचलेला गाळ काढून नौकानयन मार्ग सुकर होण्यासाठी मेरीटाईम बोडामार्फत सर्वेक्षण करुन वाळूपट्टे निश्चित केले जातात. वाळू लिलाव प्रक्रिया होऊन वाळू उत्खनन सुरु होते. मात्र, यावर्षी डिसेंबर महिना संपत आला तरीही खाडीपात्रातील वाळू लिलाव प्रक्रिया प्रशासनाने सुरू केलेली नाही.

परिणामी जिल्ह्यातील मजूर, चालक, मालकांवर उपासमारीची पाळी आली आहे. त्यामुळे रखडलेली ही वाळू लिलाव प्रक्रिया तत्काळ सुरू करा या मागणीसाठी कुडाळ तालुका डंपर चालक मालक संघटनेने बुधवार (१२ डिसेंबर) पासून येथील जिल्हाधिकारी कार्यालया समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते.आंदोलनाच्या चौथ्या दिवशी महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडून जिल्हाधिकाऱ्यांना वाळू उत्खनन बाबत अहवाल प्राप्त झाला. यानुसार जिल्हाधिकार्‍यानी पंधरा दिवसात आवश्यकती कार्यवाही पूर्ण करून हातपाटी वाळू उत्खनन परवाने दिले जाणार असल्याचे लेखी आश्वासन या डंपर चालक मालक संघटनेला दिले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने डंपर आंदोलनाच्या चौथ्या दिवशीच वाळुसाठी लिलाव जाहिर केले आहे. या साठीची जाहिरात आज बुधवारी जाहीर होणार आहे.१५ दिवसांत उत्खनन सुरु होणारया वाळू लिलावामध्ये कालावल खाडीतील ६ आणि कर्ली खाडीतील ३ अशा एकूण ९ पट्ट्यातील वाळू काढण्यासाठी पट्टे निश्चित करून वाळू लिलावासाठी निविदा काढण्यात आली आहे. आता जिल्ह्यातील वाळू व्यवसाइकांनी या वाळू लिलावाला प्रतिसाद देणे आवश्यक असून असे झाल्यास ही वाळू लिलाव प्रक्रिया पूर्ण होऊन १५ दिवसांत प्रत्यक्ष वाळू उत्खनन सुरु होऊन जिल्ह्याचा वाळू प्रश्न मार्गी लागणार आहे.

टॅग्स :sandवाळूsindhudurgसिंधुदुर्गcollectorजिल्हाधिकारी