शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : अखेर चोराच्या मुसक्या आवळल्या, देवगडातील घटना, सोन्याचे मंगळसूत्र, रोख रक्कम, मोबाईल चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 19:53 IST

देवगड ब्राह्मणदेववाडी येथील नीता बापट यांच्या घरातील सोन्याचे मंगळसूत्र, रोख रक्कम आणि मोबाईल चोरणाऱ्या चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले. मोहन जानू ठाकरे (३५, रा. ब्राह्मणदेववाडी-देवगड) असे संशयिताचे नाव असून त्याला कणकवली बसस्थानक परिसरातून ताब्यात घेतले आहे.

ठळक मुद्देअखेर चोराच्या मुसक्या आवळल्या, देवगडातील घटना सोन्याचे मंगळसूत्र, रोख रक्कम, मोबाईल चोरी

सिंधुदुर्गनगरी : देवगड ब्राह्मणदेववाडी येथील नीता बापट यांच्या घरातील सोन्याचे मंगळसूत्र, रोख रक्कम आणि मोबाईल चोरणाऱ्या चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले. मोहन जानू ठाकरे (३५, रा. ब्राह्मणदेववाडी-देवगड) असे संशयिताचे नाव असून त्याला कणकवली बसस्थानक परिसरातून ताब्यात घेतले आहे. ठाकरे याने गुह्याची कबुली दिली असून चोरीला गेलेला मुद्देमाल त्याच्याकडून हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक विश्वजित कार्इंगडे यांनी दिली.२३ मे २०१७ रोजी मध्यरात्रीनंतर देवगड ब्राह्मणदेववाडी येथील बापट यांच्या घराच्या खिडकीतून कोणीतरी हात घालत पर्समधील सोन्याचे मंगळसूत्र, डूल, २५ हजार रुपयांची रोख रक्कम तसेच एक मोबाईल असा ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची तक्रार नीता बापट (४१) यांनी देवगड पोलीस ठाण्यात दिली होती. या तक्रारीनुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या तपासाकरिता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक तैनात केले होते. या पथकाने देवगड येथे जाऊन गुन्ह्याचा सतत पाठपुरावा केला होता. या गुन्ह्याच्या अनुषंगाने हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार, भंगारवाले यांची तपासणी करण्यात आली होती. हे करीत असताना शुक्रवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजित कार्इंगडे यांना त्यांच्या खबऱ्यांमार्फत देवगड तालुक्यातील एक व्यक्ती कणकवली बाजारपेठेतील एका सुवर्णकाराच्या दुकानात सोन्याचे दागिने विक्रीकरिता येणार असल्याची माहिती मिळाली होती.त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक कणकवली येथे रवाना झाले होते. हे पथक कणकवली बाजारपेठ व आजूबाजूला शोध घेत असताना कणकवली बसस्थानक येथे पोलीस निरीक्षक विश्वजित कार्इंगडे यांनी सागितल्याप्रमाणे एक व्यक्ती सापडली. त्याला त्याचे नाव विचारले असता त्याने मोहन जानू ठाकरे, वय ३५ वर्षे, रा. ब्राह्मणदेववाडी, ता. देवगड असे सांगितले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे सोन्याचे मंगळसूत्र व डूल असे दागिने मिळून आले.या दागिन्यांबाबत त्याच्याकडे विचारपूस केली असता ठाकरे याने उडवाउडवीची उत्तरे दिली. म्हणून पथकातील पोलिसांनी त्यास अधिक विश्वासात घेऊन सविस्तर तपास केला असता त्याने ब्राह्मणदेववाडी, (ता. देवगड) येथे राहणारे बापट यांच्या घराच्या खिडकीतून हात घालून चोरी केली असल्याचे कबूल केले.सततच्या पाठपुराव्यामुळे गुन्हा उघडकीससतत पाठपुरावा करीत राहिल्याने हा गुन्हा उघडकीस आला. पोलीस निरीक्षक विश्वजित कार्इंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकातील पोलीस हवालदार गुरुनाथ कोयंडे, पोलीस नाईक संतोष सावंत, पोलीस शिपाई संकेत खाडये, रवि इंगळे, ज्ञानेश्वर कांदळगावकर, स्वाती सावंत यांनी ही कारवाई केली.

या कामगिरीबाबत त्यांचे जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम व अप्पर पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड यांनी कौतुक करुन त्यांना पारितोषिक जाहीर केले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विश्वजित कार्इंगडे यांनी दिली. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गPoliceपोलिसTempleमंदिर