कुत्र्याला हुसकावून लावत चोरट्याने लांबविले पारोळ्यातील अंबिका डेअरीतून १६ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 05:18 PM2017-11-25T17:18:02+5:302017-11-25T17:22:22+5:30

जळगाव जिल्ह्यात चोरी आणि घरफोड्यांचे सत्र सुरुच

Over 16 lakhs of Ambika Dairy in Parola, which was chanted by the thieves | कुत्र्याला हुसकावून लावत चोरट्याने लांबविले पारोळ्यातील अंबिका डेअरीतून १६ लाख

कुत्र्याला हुसकावून लावत चोरट्याने लांबविले पारोळ्यातील अंबिका डेअरीतून १६ लाख

googlenewsNext
ठळक मुद्देचोरट्याने लांबविली १६ लाख २७ हजार रुपयांची रक्कमचोरीचा घटनाकक्रम सीसीटीव्ही कॅमेºयात कैदचोरीची माहिती मिळाल्यानंतर डेअरीमालकाला आली भोवळ

आॅनलाईन लोकमत
पारोळा,दि.२५ : पारोळा-अमळनेर रस्त्यावरील शनिमंदिरा जवळील अंबिका दूध डेअरीत पहाटे चार वाजेच्या सुमारास एक अज्ञात चोरट्याने कापटाच्या तिजोरीचे लॉक तोडून त्यातून १६ लाख २७ हजार रुपयांची रक्कम लांबविली. या चोरीबाबत डेअरीचे मालक गोपाल महाजन यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल आहे.
दिनांक २५ रोजी पहाटे ४.२३ वाजता एक अज्ञात चोरटा बिना नंबरची मोटारसायकल ने आंबिका डेअरीत प्रवेश केला. परंतु त्या मागे कुत्रे लागल्याने तो पळून गेला. पुन्हा पाच मिनिटांनी लोखंडी रॉड घेऊन आला आणि कुत्र्याला पळून लावत त्याने दूध डेअरीच्या कार्यालयात जाऊन ज्या कपाटात पैसे ठेवले होते त्या कपाटाचे लॉक तोडून पैसे घेऊन पसार झाला. या चोरट्याच्या हालचाली सीसीटीव्ही कॅमेºयात टिपल्या गेल्या आहेत. पण त्याने सर्व चेहरा रुमालाने बांधलेला आहे डोळ्यावर गॉगल आहे म्हणून ओडखला जात नाही
या चोरी ची बातमी कळताच पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, चाळीसगाव अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, अमळनेर विभागाचे उपअधीक्षक रऊप शेख, पोलीस निरीक्षक एकनाथ पाडले यांनी घटनास्थळी भेट दिली. दूध डेअरीचे मालक गोपाल महाजन यांना डेअरीत चोरी झाल्याचे कळल्यावर त्यांना भोवळ आली होती. चौथ्या शनिवारी बँकेला सुटी असते. त्यामुळे एक दिवस आधी दूध विक्रेत्यांना पेमेंट देण्यासाठी त्यांनी तिजोरीत पैसे ठेवले होते.
डेअरीमालक गोपाल महाजन यांनी श्वान पथक बोलविण्याची तसेच कपाटावरील चोरट्याच्या हाताचे ठसे घेण्याची मागणी केली. मात्र संध्याकाळी ६ वाजेपर्यंत श्वान पथक किंवा ठसे तज्ज्ञ आलेले नव्हते. घटनास्थळाचा पंचनामा पोलीस निरीक्षक एकनाथ पाडले यांच्यासह कर्मचाºयांनी केला.
 

Web Title: Over 16 lakhs of Ambika Dairy in Parola, which was chanted by the thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.