शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

सिंधुदुर्ग : सिंधुसरस कृषी क्षेत्रासाठी पर्वणी : दीपक केसरकर, आंगणेवाडी येथे महोत्सवाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 4:53 PM

भाविक आणि शेतकरी बांधवांना कृषी क्षेत्रातील पर्वणी ठरणारा राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन व सिंधु सरस महोत्सव होत आहे. पर्यटन जिल्हा अशी ख्याती असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात राज्यव्यापी कृषी प्रदर्शन मेळाव्याची आवश्यकता होती. शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी भविष्यातील जिल्ह्याच्या विकासात कृषी महोत्सवांचे मोठे योगदान असेल, असे प्रतिपादन वित्त व गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.

ठळक मुद्देसिंधुसरस कृषी क्षेत्रासाठी पर्वणी : दीपक केसरकरआंगणेवाडी येथे महोत्सवाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

मालवण : भाविक आणि शेतकरी बांधवांना कृषी क्षेत्रातील पर्वणी ठरणारा राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन व सिंधु सरस महोत्सव होत आहे. पर्यटन जिल्हा अशी ख्याती असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात राज्यव्यापी कृषी प्रदर्शन मेळाव्याची आवश्यकता होती. शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी भविष्यातील जिल्ह्याच्या विकासात कृषी महोत्सवांचे मोठे योगदान असेल, असे प्रतिपादन वित्त व गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.आंगणेवाडी येथे २५ ते २९ जानेवारी या कालावधीत राज्यशासन व सिंधुदुर्ग जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या सिंधु सरस महोत्सवाचा शुभारंभ पालकमंत्री केसरकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा संचालक विजय चव्हाण, सभापती मनीषा वराडकर, उपसभापती अशोक बागवे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, नागेंद्र परब, तहसीलदार समीर घारे, जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजीराव शेळके, महाराष्ट्र महाक्वॉयर बोर्डच्या लीना बनसोडे, सरपंच लक्ष्मी पेडणेकर, उपविभागीय कृषी अधीक्षक अडसूळ, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक मंगेश महाले, जीवनोन्नोती अभियानाचे सिंधुदुर्ग प्रमुख देविदास नारनवरे, गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर तसेच इतर तालुक्यांचे गटविकास अधिकारी व प्रमुख व आंगणेवाडी मंडळ अध्यक्ष भास्कर आंगणे, नरेश आंगणे, मधुकर आंगणे, अनंत आंगणे आदी उपस्थित होते. बचतगटांचा सिंधु सरसला मोठा प्रतिसाद मिळाला असून बहुतांश सर्व स्टॉल्सचे बुकिंग पूर्ण झाले आहे. महिलांनी उत्पादित केलेल्या मालाचा व खाद्यपदार्थांचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या मालाची खरेदी करून केसरकर यांनी बचतगटांच्या प्रदर्शन व विक्रीचा शुभारंभ केला. शेतकऱ्यांना धान्य महोत्सव, चर्चासत्रे, पुरस्कार वितरण, गृहोपयोगी वस्तू, सूक्ष्म सिंचन, खाद्य पदार्थांचेही स्टॉल उपलब्ध करून दिले जाणार असून लाभ घेण्याचे आवाहन पालकमंत्री केसरकर यांनी केले आहे.

कृषी महोत्सवाचे उद्घाटनआंगणेवाडी येथे पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या भव्य जिल्हा कृषी मेळाव्याचा शुभारंभ पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केला. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कृषी महोत्सवाचे अधिकृतरित्या उद्घाटन केले आहे. जिल्ह्यातील शेतकरी व चाकरमान्यांसाठी हे कृषी प्रदर्शन उपयुक्त ठरणार आहे. महाराष्ट्र तसेच गुजरात येथील नामांकित कृषी क्षेत्रातील अग्रेसर कंपन्या प्रदर्शनात सहभागी होत असल्याने आंगणेवाडी येथील कृषी प्रदर्शन महाराष्ट्र राज्याला मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त करताना शिवसेना पक्षप्रमुखांच्या स्वागतासाठी जिल्हा सज्ज झाला असल्याचे सांगितले.विविध २०० स्टॉलशासनाच्या कृषी विभागाकडून हे प्रदर्शन होत आहे. यात शेतकऱ्यांसाठी शेती व्यवसायातील अद्ययावत तंत्रज्ञान याविषयी प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यात येणार आहे. सरकारी योजनांची माहिती देणारे कृषी विभागाच्या ४० स्टॉल्ससह विविध विभागांचे २०० स्टॉल लावले जातील.

 

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर agricultureशेतीsindhudurgसिंधुदुर्ग