शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी मैदानात...
3
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
4
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
5
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
6
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
7
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
8
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
9
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
10
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
11
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
12
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
13
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
14
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
15
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
16
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
17
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
18
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
19
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
20
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 

सिंधुदुर्ग : मच्छिमार्केटलगतचे गाळे जमीनदोस्त, वेंगुर्ले नगरपरिषदेकडून कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 12:10 PM

वेंगुर्ले नगरपरिषदेच्या मच्छिमार्केटलगतच्या धोकादायक इमारतीतील असणाऱ्या त्या पंधरा गाळ््यांचा ताबा अखेर नायब तहसीलदारांच्या पथकाने नगरपरिषदेकडे दिल्यानंतर नगरपरिषदेने हे सर्व गाळे जमीनदोस्त केले.

ठळक मुद्दे मच्छिमार्केटलगतचे गाळे जमीनदोस्त, वेंगुर्ले नगरपरिषदेकडून कारवाई गाळेधारकांनी घेतली होती उच्च न्यायालयात धाव

वेंगुर्ले : वेंगुर्ले नगरपरिषदेच्या मच्छिमार्केटलगतच्या धोकादायक इमारतीतील असणाऱ्या त्या पंधरा गाळ््यांचा ताबा अखेर नायब तहसीलदारांच्या पथकाने नगरपरिषदेकडे दिल्यानंतर नगरपरिषदेने हे सर्व गाळे जमीनदोस्त केले.नगरपरिषद मच्छिमार्केटलगतच्या इमारतीतील १५ व्यापारी गाळेधारकांना ही इमारत धोकादायक झाल्याने गाळे खाली करण्यास सांगण्यात आले होते. मात्र, गाळेधारकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

उच्च न्यायालयाने सर्व गाळेधारकांना व्यवसायासाठी ३१ जुलै रोजी सोडत पद्धतीने पर्यायी गाळे संबंधित गाळेधारकांना द्यावेत व १४ आॅगस्ट सायंकाळपर्यंत जुन्या गाळ््यांचा ताबा घेण्याचे आदेश नगरपरिषदेला दिले होते. त्यानुसार सोडत पद्धतीने दहा गाळेधारकांनी गाळे घेतले. मात्र, अकरापैकी एकाही गाळेधारकाने नगरपरिषदेकडे जुन्या गाळ््यांचा ताबा १५ आॅगस्टपर्यंत दिला नव्हता.त्यानुसार गुरुवारी वेंगुर्लेचे निवडणूक नायब तहसीलदार संतोष बांदेकर, निवासी तहसीलदार नागेश शिंदे, मंडळ निरीक्षक बी. सी. चव्हाण, तलाठी व्ही. एन. सरवदे, नागराज, लिपीक ए. आर. पोळ यांच्या पथकाने दुपारी ३ वाजता गाळ््यांची पाहणी केली.

हे गाळे रिक्त असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांचा पंचनामा करुन गाळे नगरपरिषदेच्या ताब्यात दिले. या प्रक्रियेची व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आली आहे. त्यानंतर नगरपरिषदेकडून सर्व गाळे जमीनदोस्त करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू होते.पंचनामे करून नगरपरिषदेच्या ताब्यातयाबाबत मुख्याधिकारी वैभव साबळे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे गाळ््यांचा ताबा नगरपरिषदेला मिळवून देण्याची मागणी केली. त्यानुसार निवासी उपजिल्हाधिकारी यांनी वेंगुर्ले नायब तहसीलदारांना पंचनामे करुन हे गाळे नगरपरिषदेच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महसूल विभागाकडून आवश्यक ती कार्यवाही करून हे गाळे वेंगुर्ले नगरपरिषदेच्या ताब्यात देण्यात आले होते.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाsindhudurgसिंधुदुर्ग