शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सिंधुदुर्ग : कासार्डेतील महिलांचा दारूबंदीसाठी एल्गार, आठशे महिलांनी ग्रामसभा गाजवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 11:16 IST

कणकवली तालुक्यातील कासार्डे गावात सुरू असलेला बिअरबार तसेच अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतल्याने महिलांचा आक्रोश जागतिक महिला दिनी आयोजित खास ग्रामसभेत दिसून आला. गावात दारूबंदी करण्यासाठी खास ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त जागतिक महिला दिनी गावातील अत्यंत संवेदनशील विषयावार महिलांची आक्रमकता दिसून आली.

ठळक मुद्देकासार्डेतील महिलांचा दारूबंदीसाठी एल्गारआठशे पेक्षा अधिक उपस्थित महिलांनी ग्रामसभा गाजवली

सिंधुदुर्ग : कणकवली तालुक्यातील कासार्डे गावात सुरू असलेला बिअरबार तसेच अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतल्याने महिलांचा आक्रोश जागतिक महिला दिनी आयोजित खास ग्रामसभेत दिसून आला. गावात दारूबंदी करण्यासाठी खास ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त जागतिक महिला दिनी गावातील अत्यंत संवेदनशील विषयावार महिलांची आक्रमकता दिसून आली.

कासार्डेतील महिलांनी दारूबंदी साठी आयोजित केलेल्या महिला ग्रामसभेला महिलांचे घोषणा देत ग्रामपंचायतमध्ये आगमन झाले. यावेळी दारूबंदीचे समर्थन करणारा फलक हातात होता.

कासार्डे ग्रामपंचायतीने दारू विक्री संदर्भात आयोजित ग्रामसभेला महिलांनी सकाळपासून गर्दी केली होती. कासार्डे गावातील २२ वाड्यांतील महिलांनी मिळेल त्या वाहनांनी ग्रामसभेला हजेरी लावण्यासाठी हातात दारूबंदीचे फलक घेऊन सभागृहात प्रवेश केला. त्यानंतर मतदार ओळख पटविल्यानंतर ख-या अर्थाने ग्रामसभेला सुरूवात झाली.प्रारंभी उपस्थितीत ग्रामस्थांचे पंचायत समिती सदस्य प्रकाश पारकर यांनी स्वागत करून सभेची सुरूवात केली. सरपंच बाळाराम तानवडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी अमित पाडळकर, पंचायत समितीचे निरिक्षक पवार, पोलिस अधिकारी, तसेच जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई, ग्रामविकास अधिकारी प्रविण कुडतरकर, दारूबंदी समिती अध्यक्षा तथा कासार्डे उपसरपंच पूजा जाधव, सर्व ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष सावंत, पोलीस पाटील महेंद्र देवरूखकर, माजी जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया पाताडे, मानसी वाळवे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.सभेला एकूण ३३६३ मतदारांपैकी १६६३ मतदार ग्रामस्थ उपस्थित राहणे आवश्यक होते. पण ८५२ मतदार उपस्थित राहिल्याने कोरम अभावी ही सभा तहकूब करण्यात आली. या सभेत ग्रामविकास अधिकारी प्रविण कुडतरकर यांनी ही कायदेशीर विषयावर ग्रामसभेला विशेष मार्गदर्शन केले.दारूबंदी झालीच पाहिजेशेवटी शासनाची भूमिका व नियम काहीही असोत कासार्डे गावात दारूबंदी झालीच पाहिजे ही आग्रही भूमिका दर्शना पाताडे यांनी माडून सदरचे बिअरशॉपी व दारूविक्री बंद करण्याबाबत आम्हाला कायदा हातात घेण्याची वेळ येऊ देऊ नये असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

 

टॅग्स :liquor banदारूबंदीsindhudurgसिंधुदुर्गWomenमहिला