शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्ह्यात११ आरोग्य केंद्रांना डॉक्टरच नाही,आरोग्य समिती सभेत उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 14:40 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यासह ग्रामीण भागात आरोग्याची गंभीर समस्या भेडसावत असतानाच जिल्ह्यातील ३८ प्राथमिक आरोग्य केंद्रापैकी तब्बल ११ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये एकही डॉक्टर नसल्याची बाब आरोग्य समिती सभेत उघड झाली. या ११ आरोग्य केंद्रांची आरोग्य सेवा रामभरोसे असून तेथील रुग्णांचे हाल होत आहेत याकडे आरोग्य विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी सदस्यांनी सभेत केली.

ठळक मुद्दे ११ आरोग्य केंद्रांना डॉक्टरच नाही,आरोग्य समिती सभेत उघड  आरोग्य सेवा रामभरोसे, रूग्णांचे हाल, लक्ष देण्याची मागणी

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यासह ग्रामीण भागात आरोग्याची गंभीर समस्या भेडसावत असतानाच जिल्ह्यातील ३८ प्राथमिक आरोग्य केंद्रापैकी तब्बल ११ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये एकही डॉक्टर नसल्याची बाब आरोग्य समिती सभेत उघड झाली. या ११ आरोग्य केंद्रांची आरोग्य सेवा रामभरोसे असून तेथील रुग्णांचे हाल होत आहेत याकडे आरोग्य विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी सदस्यांनी सभेत केली.जिल्ह्यात सध्या आरोग्याचा गंभीर प्रश्न असतानाच रेडी व आडेली प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर आणि कर्मचारी नसल्याने ही केंद्रे बंद पडण्याच्या मार्गावर असल्याच्या मुद्यावर सभेत चर्चा झाली.यावेळी जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील ३८ प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी तब्बल ११ प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टरच नसल्याचे आरोग्य अधिकारी खलिपे यांनी सांगितले. मात्र, या ११ ठिकाणची आरोग्य सेवा रामभरोसे असून तेथील रुग्णांचे हाल होत आहेत.

त्यामुळे त्या ठिकाणी डॉक्टराची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी सदस्यांनी केली. तर आपल्याला आयुषअंतर्गत प्रथम २० बी.ए.एम.एस. डॉक्टर मिळाले असून त्यांचे प्रशिक्षण पूर्ण होताच त्याठिकाणी नियुक्त केले जातील असेही आरोग्य अधिकाऱ्यांनी सभागृहात स्पष्ट केले. दुर्धर आजाराने पिडीत रुग्णांना अर्थसहाय्य करणे योजनेंतर्गत जिल्हा परिषदेमार्फत १५ हजार रुपये अनुदान दिले जाते.या योजनेचे ५७ प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून त्यासाठी सुमारे ८ लाख रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. या ५७ जणांना १४ आॅगस्ट रोजी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या हस्ते धनादेश वाटप केले जाणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी दिली.

टॅग्स :Healthआरोग्यsindhudurgसिंधुदुर्ग