शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन आराखडा : पहिल्या टप्प्यात १२५ कोटी प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 14:57 IST

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनच्या २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी विविध विकासकामांसाठी मंजूर करण्यात आलेल्या १७९ कोटी रुपये आराखड्यापैकी पहिल्या टप्प्यात १२५ कोटी रुपये जिल्हा नियोजन विभागाकडे प्राप्त झाले आहेत. यातील उर्वरित तीस टक्के निधी दुसऱ्या टप्प्यात वर्ग होणार आहे.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्हा नियोजन आराखडा पहिल्या टप्प्यात १२५ कोटी प्राप्तउर्वरित निधी दुसऱ्या टप्प्यात

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा नियोजनच्या २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी विविध विकासकामांसाठी मंजूर करण्यात आलेल्या १७९ कोटी रुपये आराखड्यापैकी पहिल्या टप्प्यात १२५ कोटी रुपये जिल्हा नियोजन विभागाकडे प्राप्त झाले आहेत. यातील उर्वरित तीस टक्के निधी दुसऱ्या टप्प्यात वर्ग होणार आहे.फेब्रुवारी महिन्यात जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली होती. समिती अध्यक्ष तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जिल्हा नियोजन समितीचा तब्बल १७९ कोटी रुपयांचा वार्षिक आराखडा मंजूर करून अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आला होता. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या आराखड्यास कात्री न लावता तो मंजूर केला होता.दरम्यान, पहिल्या टप्प्यात शासनाने राज्यातील सर्व नियोजन विभागांना मंजूर आराखड्याच्या ७० टक्के निधी वर्ग करण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन विभागाला १७९ कोटी पैकी १२५ कोटी रुपये निधी उपलब्ध झाला आहे. हा निधी टप्प्याटप्प्याने जिल्हा परिषद तसेच जिल्हा प्रशासनातील विविध विभागांत वर्ग करण्यात येणार आहे.५४ कोटी रुपये डिसेंबरअखेर मिळणारशासनाने यावर्षीपासून राज्यातील सर्व जिल्हा नियोजन विभागांना मंजूर वार्षिक आराखड्यापैकी पहिल्या टप्प्यात ७० टक्के निधी वर्ग करण्याचे धोरण अवलंबिले आहे. तर दुसऱ्या टप्प्यात ३० टक्के निधी वर्ग केला जाणार आहे. त्यानुसार जिल्हा नियोजन विभागाला पहिल्या टप्प्यात १२५ कोटी निधी प्राप्त झाला आहे. तर उर्वरित ५४ कोटी रुपये डिसेंबरअखेर मिळण्याची शक्यता आहे. पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जिल्हा नियोजन वार्षिक आराखड्याचा आलेख दरवर्षी चढता ठेवलेला आहे. 

टॅग्स :zpजिल्हा परिषदsindhudurgसिंधुदुर्ग