शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

आधार नोंदणी लिंक मोहिमेत राज्यात सिंधुदुर्ग जिल्हा प्रथम

By admin | Updated: July 31, 2015 01:27 IST

कोल्हापूर जिल्हा द्वितीय

कुडाळ : मतदार यादीतील आधार नोंदणी लिंक मोहिमेत राज्यात सिंधुदुर्ग जिल्हा प्रथम, तर कोल्हापूर जिल्हा द्वितीय असल्याची माहिती कुडाळ निवडणूक विभागाने दिली. जिल्ह्यात कुडाळ विधानसभा मतदारसंघ याबाबतीत प्रथम क्रमांकावर आहे. राष्ट्रीय निवडणूक विभागाने मतदार यादी सदोष करण्याची मोहीम सुरू केली आहे. मतदार यादीतील मतदारांच्या आधार कार्डची नोंदणी मतदार यादीत जोडण्याची मोहीम निवडणूक विभागाने १२ मार्च ते ३१ जुलै २0१५ या कालावधीत सुरू केली होती. या मोहिमेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६ लाख २६ हजार ९८0 मतदारांपैकी ३ लाख २६ हजार ९५९ एवढी म्हणजे ५0.५४ टक्के आधार नोंदणी पूर्ण झालेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ विधानसभा मतदारसंघातील २ लाख ५ हजार १३७ मतदारांपैकी १ लाख ११ हजार १३७ एवढी आधार नोंदणी पूर्ण झालेली आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघातील २ लाख २३ हजार ६७ मतदारांपैकी १ लाख १५ हजार ९६0 एवढी तर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील २ लाख १८ हजार ७७६ मतदारांपैकी ९९ हजार ८८४ एवढ्या मतदारांच्या आधार नोंदणीचे लिंकिंग पूर्ण झाल्याची माहिती कुडाळ निवडणूक विभागाने दिली आहे. (प्रतिनिधी )