शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

देवगड हापूसला आता चांगला दर मिळेल, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदारांकडून कंपनीमार्फत थेट आंबा खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 13:59 IST

हापूसला चांगला भाव मिळावा यासाठी कोणत्याही मध्यस्थामार्फत आंबा खरेदी न करता आमदार नीतेश राणे यांच्या पुढाकारातून महिंंद्रा अँड महिंंद्रा कंपनीमार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदारांकडून आंबा थेट खरेदी करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदारांकडून कंपनीमार्फत थेट आंबा खरेदी आता बागायतदारांना चांगला दर मिळेल : प्रकाश राणे

देवगड : हापूसला चांगला भाव मिळावा यासाठी कोणत्याही मध्यस्थामार्फत आंबा खरेदी न करता आमदार नीतेश राणे यांच्या पुढाकारातून महिंंद्रा अँड महिंंद्रा कंपनीमार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदारांकडून आंबा थेट खरेदी करण्यात येणार आहे.

यामुळे बागायतदारांना चांगला दर मिळेल असे पत्रकार परिषदेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश राणे यांनी सांगितले.यावेळी नगरसेवक गणपत गावकर, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वर खवळे, उपाध्यक्ष चंद्रकांत कावले उपस्थित होते.हापूस आंब्याला चांगला भाव मिळावा यासाठी कोणत्याही मध्यस्थामार्फत आंबा खरेदी न करता थेट सिंधुदुर्गातील आंबा बागायतदारांकडून आंबा खरेदी करावा अशा सुचना महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीच्या अधिकाºयांना आमदार नीतेश राणे यांनी केल्या होत्या.त्यानुसार २० फेब्रुवारी रोजी या कंपनीचे अधिकारी कुणाल रावत व रीना वर्मा यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत हापूस आंबा खरेदीबाबत सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर यंदापासून कंपनीमार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून आंबा घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले. कंपनीच्या दोन्ही अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील देवगड व वेंगुर्ला या तालुक्यांमधील काही बागांची प्रत्यक्ष पाहणी केली असे पत्रकार परिषदेत प्रकाश राणे यांनी सांगीतले.आंब्याचा विक्री व्यवस्थेतील दुरवस्थेमुळे शेकडो हेक्टर आंबा बागायतींमध्ये उत्पादन घेण्याचे शेतकऱ्यांनी थांबविले होते. उत्पादनामध्ये होणारा खर्च व मिळणारे उत्पन्न यामध्ये मेळ नसल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला होता. त्यातच आंब्याला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला होता.याचा विचार करून आमदार नीतेश राणे यांनी महिंंद्रा अँड महिंद्रा कंपनीमार्फत आंब्याला योग्य भाव देण्याच्यादृष्टीने प्रयत्न केले असून यातून निश्चितच शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल असा विश्वास यावेळी प्रकाश राणे यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे fruitsफळेsindhudurgसिंधुदुर्ग