शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : दहशतवादी सनातनवर बंदी घाला, जिल्हा काँग्रेसची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 12:13 IST

सनातन संस्थेच्या लोकांकडून देशातील धर्मनिरपेक्षतेवर घाला घालण्यात येत असून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा त्यांचा डाव आहे. अनेक दहशतवादी कारवायांमध्ये त्यांचा हात असल्याने सनातन संस्थेवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिका?्यांमार्फत शासनाकडे करण्यात आली असल्याची माहिती काँग्रेसचे प्रवक्ते डॉ जयेंद्र परुळेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

ठळक मुद्देकॉंग्रेसच्या चिन्हावर निवडून येत स्वतंत्र गट स्थापन जिल्हा परिषद सदस्यांवर कायदेशीर कारवाई करणार

ओरोस : सनातन संस्थेच्या लोकांकडून देशातील धर्मनिरपेक्षतेवर घाला घालण्यात येत असून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा त्यांचा डाव आहे. अनेक दहशतवादी कारवायांमध्ये त्यांचा हात असल्याने सनातन संस्थेवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे करण्यात आली असल्याची माहिती काँग्रेसचे प्रवक्ते डॉ जयेंद्र परुळेकर यांनी सांगितले.सिंधुदुर्गनगरी येथे ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस प्रमोद जैतापकर, ईर्षान शेख, संतोष जोईल आदि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी डॉ. परुळेकर म्हणाले की, दहशतवाद विरोधी पथकाने केलेल्या धडक कारवाईत सुरुवातीला २० बॉम्ब आणि स्फोटके जप्त केली होती. त्यानंतर आणखी ५० बॉम्ब जप्त करण्यात आले आहेत.

याप्रकरणी सनातनसंस्थेच्या वैभव राऊतसह इतर दोन-तीन लोकांना अटक करण्यात आली आहे. ही खूप मोठी घटना असून याद्वारे देशातील धर्मनिरपेक्षतेवर घाला घालण्यात येत असून धमार्चे ध्रुवीकरण करण्यात येत आहे, त्यामुळे सनातन संस्थेवर बंदी घालण्यात यावी तसेच त्याचे मुखपत्र सनातन प्रभात हेही बंद करण्यात यावे अशी मागणी जिल्हा कॉंग्रेस पक्षाच्या वतीने शासनाकडे करण्यात आली आहे त्याबाबतचे निवेदनहि आज जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले असल्याची माहिती डॉ जयेंद्र परुळेकर यांनी दिली.त्या सदस्यांवर कारवाई करणारफेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणूकित राष्ट्रिय कॉंग्रेस पक्षाच्या "हात" या चिन्हावर ५० पैकी २७ सदस्य निवडून आले आहेत. मात्र महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन होताच या सर्व सदस्यांनी स्वतन्त्र गट स्थापन केला आहे. मात्र उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने दिलेल्या निर्णयानुसार एखाद्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेला सदस्य स्वतंत्र गट स्थापन करू शकत नाही आणि तसे केल्यास ती व्यक्ति अपात्र ही होवू शकते असे सांगत जिप मध्ये कॉंग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या २७ सदस्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती जयेंद्र परुळेकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

टॅग्स :congressकाँग्रेसsindhudurgसिंधुदुर्ग