शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : वाळू व्यावसायिकांची ग्रामस्थांवर दादागिरी, सरंबळ नदी किनाऱ्यावरील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 15:45 IST

सरंबळ-बागवाडीच्या नदीकिनारी अनधिकृत वाळू उत्खनन आणि वाळू वाहतूक कशाप्रकारे केली जाते. हे प्रभारी तहसीलदार टी. एच्. मठकर यांना दाखविण्यासाठी गेलेल्या बागवाडीच्या ग्रामस्थांच्या अंगावर वाळू व्यावसायिक धावून आले. हा प्रकार पोलीस आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर घडला.

ठळक मुद्देवाळू व्यावसायिकांची ग्रामस्थांवर दादागिरीसरंबळ नदी किनाऱ्यावरील घटना तहसीलदारांकडून वाळू उत्खननासह वाहतूक बंद

कुडाळ : सरंबळ-बागवाडीच्या नदीकिनारी अनधिकृत वाळू उत्खनन आणि वाळू वाहतूक कशाप्रकारे केली जाते. हे प्रभारी तहसीलदार टी. एच्. मठकर यांना दाखविण्यासाठी गेलेल्या बागवाडीच्या ग्रामस्थांच्या अंगावर वाळू व्यावसायिक धावून आले. हा प्रकार पोलीस आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर घडला.

अखेर प्रभारी तहसीलदार टी. एच्. मठकर यांनी वाळू व्यावसायिकांची दादागिरी पाहून या ठिकाणी होणारी वाळू उत्खनन व वाहतूक बंद केली आहे. जोपर्यंत ग्रामस्थांच्या निवेदनावर निर्णय होत नाही, तोपर्यंत हे उत्खनन व वाहतूक बंद राहणार आहे.कुडाळ सरंबळ येथे जाणारा रस्ता मोठ्या प्रमाणात खड्डेमय होऊन येथील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेकडे शासनाने लक्ष देऊन हा रस्ता सुस्थितीत आणावा यासाठी प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदने दिली होती.

दोन आंदोलनानंतर सुध्दा येथील रस्त्याच्या दुरवस्थेकडे प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केले असल्याने येथील संतप्त ग्रामस्थांनी पुन्हा एकदा सरंबळ येथे वाळू वाहतूक करणारे डंपर अडवून आंदोलन सुरू केले.

या आंदोलनाची माहिती मिळताच कुडाळचे प्रभारी तहसीलदार टी. एच. मठकर, कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिंदे तसेच महसूल, पोलीस, बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी ९.३० वाजता सरंबळ येथे आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणी जात आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली.यावेळी येथील ग्रामस्थांनी या ठिकाणी सुरू असलेल्या दिवस रात्र वाळू वाहतुकीमुळे येथील रस्त्याची दुर्दशा झालेली असून जोपर्यंत येथील रस्ता सुस्थितीत होत नाही, तोपर्यंत येथून वाळू वाहतूक केली जाऊ देणार नसल्याचा इशारा देत आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा घेतला. तसेच मागण्यांचे लेखी निवेदन यावेळी दिले.

यावेळी मठकर यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी या रस्त्याच्या दुरूस्तीबाबत चर्चा केली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी येथील रस्त्याच्या दुरूस्तीचा प्रस्ताव केलेला आहे, असे सांगितले. येथील आंदोलनकर्त्यांच्या मागण्या वरिष्ठांपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले.

त्याचवेळी ग्रामस्थांनी उत्खनन व वाहतूक होणाऱ्या ठिकाणाची माहिती देण्यासाठी प्रभारी तहसीलदार मठकर यांना घेऊन गेले. यावेळी वाळू व्यावसायिक ग्रामस्थांच्या अंगावर धावून आल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

अखेर प्रभारी तहसीलदार टी. एच. मठकर यांनी वाळू व्यावसायिकांची दादागिरी पाहून या ठिकाणी होणारी वाळू उत्खनन व वाहतूक बंद केली आहे. जोपर्यंत ग्रामस्थांच्या निवेदनावर निर्णय होत नाही, तोपर्यंत हे उत्खनन व वाहतूक बंद राहणार आहे.

पोलीस बंदोबस्तसरंबळ-बागवाडी येथील ग्रामस्थांनी वाळू व्यवसायामुळे होणारा त्रास महसूल विभागाकडे मांडला. त्यावरून या गावातून वाळू उत्खनन, वाहतूक बंद करण्याचा निर्णय दिला. त्या अनुषंगाने त्याठिकाणी असलेले डंपर व रॅम्पला पोलीस बंदोबस्त देण्यात आला. दरम्यान ग्रामस्थांची पोलीसांशी शाब्दिक बाचाबाची झाली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गTahasildarतहसीलदारsandवाळू