शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग :आंबा पिकावर होणार विपरीत परिणाम, बागायतदार धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 19:02 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यासह देवगड तालुक्यात दिवसभर ढगाळ वातावरण व काही ठिकाणी रिमझिम तुरळक प्रमाणात पाऊस पडल्याने तुडतुडे व कीटकांचे प्रमाण वाढून आंबा पिकावर विपरीत परिणाम होणार असल्याचे मत आंबा बागायतदारांमधून व्यक्त केले जात आहे.

ठळक मुद्देआंबा पिकावर होणार विपरीत परिणाम, बागायतदार धास्तावले ढगाळ वातावरण, पाऊस पडल्याने तुडतुडे, कीटकांचे प्रमाण वाढणार

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यासह देवगड तालुक्यात दिवसभर ढगाळ वातावरण व काही ठिकाणी रिमझिम तुरळक प्रमाणात पाऊस पडल्याने तुडतुडे व कीटकांचे प्रमाण वाढून आंबा पिकावर विपरीत परिणाम होणार असल्याचे मत आंबा बागायतदारांमधून व्यक्त केले जात आहे.बुधवारी सकाळी देवगड तालुक्यातील काही ठिकाणी तुरळक प्रमाणात पाऊस पडला. तर दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. याचा मोठा परिणाम आंबा पिकावरती होणार आहे.सध्या तालुक्यामधील शेवटच्या टप्प्यातील आंबा कलमांना मोठ्या प्रमाणात मोहोर आला आहे. तर पहिल्या टप्प्यातील आलेल्या मोहोरावरती झालेली फळधारणा त्याच कलमांना पुन्हा आंबा मोहोर आल्याने त्या झाडांवरील फळांची घळ झाली होती.अशा चिंताजनक परिस्थितीत बुधवारी तालुक्यामधील वातावरणात अचानक बदल होऊन ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. काही ठिकाणी तुरळक पाऊस पडल्याने आंबा पीक मोठ्या प्रमाणात धोक्यात आले आहे.ओखी चक्रीवादळामुळे डिसेंबर महिन्यामध्ये पडलेल्या पावसामुळे आंबा पिकावरती मोठा परिणाम झाला होता. यामुळे पहिल्या टप्प्यातील आंबा कलमांना मोहोर आल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील डिसेंबर महिन्यातील आंबा कलमांना येणारा मोहोर लांबणीवरती जाऊन तो जानेवारी महिन्याच्या शेवटी व फेब्रुवारीमध्ये आला.

आंबा कलमांना मोहोर उशिरा आल्यामुळे यावर्षी देवगड हापूसचा हंगाम एप्रिल व मे महिना अशा दोन महिन्यांमध्ये राहणार आहे. या ढगाळ वातावरणामुळे व तुरळक रिमझिम पडलेल्या पावसामुळे आंबा मोहोरावरती तुडतुड्यांचे, कीटकांचे, बुरशीचे व खारीचे प्रमाण वाढणार असल्याने कृषी सल्ल्यानुसारच फवारणी करण्यात यावी असे कृषीतज्ज्ञांचे मत आहे.

उत्पादनाच्या बाबतीत चिंतेची बाबगतवर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये काही प्रमाणात तर मार्च, एप्रिल, मे महिन्यांमध्ये असा साडेतीन महिने देवगड हापूसचा हंगाम राहिला होता. गेल्या सात ते आठ वर्षांमधील सातत्याने होत असलेली आंबा पिकाची घट गेल्यावर्षी रोखली होती व उत्कृष्ट नसलेतरी समाधानकारक असे देवगड हापूसचे उत्पादन मिळाले होते.

यामुळे यावर्षीदेखील देवगड हापूसचे पीक समाधानकारक असणार असे दिसून येत असतानाच वातावरणामधील अचानक होत असलेला बदल ही उत्पादनाच्या बाबतीत फार मोठी चिंतेची बाब ठरणार आहे.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गTemperatureतापमानfruitsफळेFarmerशेतकरी