शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग :सामुहिक बलात्कार प्रकरणी आरोपींना अटक करणाऱ्या टिमचे नगराध्यक्षांकडून अभिनंदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 14:24 IST

मळगाव येथे अल्पवयीन युवतीवर सामूहिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल होऊन बारा तासाच्या आत आरोपींना अटक करणाऱ्या सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तसेच सहकारी टिमचे नगराध्यक्ष बबनराव साळगावकर यांनी भेट घेऊन अभिनंदन केले.

ठळक मुद्देसामुहिक बलात्कार प्रकरणी आरोपींना अटक करणाऱ्या टिमचे नगराध्यक्षांकडून अभिनंदनबारातासाच्या आत कारवाई : सावंतवाडी पोलिसांची कामगिरी

सिंधुदुर्ग : मळगाव येथे अल्पवयीन युवतीवर सामूहिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल होऊन बारा तासाच्या आत आरोपींना अटक करणाऱ्या सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तसेच सहकारी टिमचे नगराध्यक्ष बबनराव साळगावकर यांनी भेट घेऊन अभिनंदन केले.सावंतवाडी शहरालगत राहणाऱ्या एका अल्पवयीन कॉलेज युवतीवर चार दिवसांपूर्वी मळगाव रेल्वे स्थानक येथील लॉज व परिसरात तिघा नराधमांकडून गुंगीचे औषध देऊन सामूहिक बलात्कार करण्यात आला. या घटनेने सिंधुदुर्ग जिल्हा हादरला आहे.

दरम्यान, या प्रकरणी संबंधित युवतीने पोलिसात धाव घेत नराधमांविरोधात तक्रार देताच गुन्हा दाखल करत सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तसेच त्यांच्या सहकार्य टिमने घटनेचे गांभीर्य लक्षात घेत यातील मुख्य आरोपी रामचंद्र्र घाडी (रा. आकेरी-कुडाळ) व मळगाव-कुंभार्ली येथील प्रशांत व राकेश राऊळ या दोघा जुळ्या भावांच्या अवघ्या बारा तासाच्या आत मुसक्या आवळल्या.त्यामुळे या प्रकरणाचा तपास करण्यास पोलिसांना सोपे झाले. मुळात आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांनी वेगळी युक्ती अवलंबिल्याने मुख्य आरोपी ताब्यात आला. त्यामुळे अन्य दोघांची नावे समोर येताच त्यांनाही पहाटे राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले.शहरात या अगोदरही बलात्काराच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र, यातील आरोपीला अटक करण्यात पोलिसांना अपयश येत असे. मळगाव येथील या प्रकरणी तीनही आरोपींना तत्काळ ताब्यात घेण्यात पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांची भूमिका उजवी ठरली.नगराध्यक्ष बबनराव साळगावकर यांच्यासह उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, नगरसेवक आनंद नेवगी, सुरेंद्र्र बांदेकर, शुभांगी सुकी, भारती मोरे आदींनी धनावडे यांची भेट घेत त्यांचे कौतुक केले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्ग