सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची प्रकृती ढासळली, उपचारासाठी गोव्याला हलवले

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: November 6, 2023 16:25 IST2023-11-06T16:25:15+5:302023-11-06T16:25:42+5:30

सिंधुदुर्ग : प्रकृती अस्वास्थामुळे सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले ...

Sindhudurg Collector Kishore Tawde health deteriorated, shifted to Goa for treatment | सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची प्रकृती ढासळली, उपचारासाठी गोव्याला हलवले

सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची प्रकृती ढासळली, उपचारासाठी गोव्याला हलवले

सिंधुदुर्ग : प्रकृती अस्वास्थामुळे सिंधुदुर्गचेजिल्हाधिकारी किशोर तावडे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत.

आज सोमवारी जिल्हाधिकारी किशोर तावडे कार्यालयात हजर होऊन त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स अटेंड केली. त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ. शाम पाटील, डॉ. आकरेकर यांच्या मार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र काही वेळापुर्वीच पुढील उपचारासाठी त्यांना गोवा मणिपाल येथे नेण्यात आले असल्याचे डॉक्टर श्याम पाटील यांनी सांगितले.

Web Title: Sindhudurg Collector Kishore Tawde health deteriorated, shifted to Goa for treatment