सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2022 12:14 IST2022-01-12T12:14:07+5:302022-01-12T12:14:37+5:30

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच आज, बुधवारी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी कोरोनाबाधित असल्याचे समोर आले ...

Sindhudurg Collector K Manjulakshmi coronated | सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी कोरोनाबाधित

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी कोरोनाबाधित

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच आज, बुधवारी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. त्यांची रॅपिड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. 

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आतापर्यंत कोरोनाच्या पहिल्या दोन्ही लाटेत चांगले काम केले आहे. त्यांनी कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबविल्या आहेत. स्वतः आपला जीव धोक्यात घालून अनेक ठिकाणच्या कोविड सेंटरला भेटी दिल्या. अनेक कोरोनाग्रस्तांना धिर देण्यासाठी आणि काम करणाऱ्यांना प्रौत्साहन देण्यासाठी सतत प्रयत्न केले आहेत.

जिल्हाधिकारी कोरोनाबाधित झाल्यानंतर प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर सॅनिटायझिंग करुन घेतला आहे.

Web Title: Sindhudurg Collector K Manjulakshmi coronated