शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : कोळोशीत बंद घर फोडले, चोरीचा प्रयत्न अयशस्वी, वाढत्या घटना पोलिसांसमोर डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 16:28 IST

कणकवली तालुक्यातील कोळोशी वरचीवाडी येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून चोरीचा प्रयत्न केला. मात्र या अज्ञात चोरट्यांना या चोरीत कोणताही मुद्देमाल हाती लागला नाही. ही घटना बुधवारी सकाळी निदर्शनास आली. सध्या घरफोड्यांचे प्रकार वाढत आहेत.

ठळक मुद्देकोळोशीत बंद घर फोडले, चोरीचा प्रयत्न अयशस्वी वाढत्या घटना पोलिसांसमोर डोकेदुखी

तळेरे : कणकवली तालुक्यातील कोळोशी वरचीवाडी येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून चोरीचा प्रयत्न केला. मात्र या अज्ञात चोरट्यांना या चोरीत कोणताही मुद्देमाल हाती लागला नाही. ही घटना बुधवारी सकाळी निदर्शनास आली. सध्या घरफोड्यांचे प्रकार वाढत आहेत.

मंगळवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी कोळोशी वरचीवाडी येथील उपेंद्र राणे यांच्या बंद घराचा कडी-कोयंडा कटावणीच्या सहाय्याने तोडून घरात घुसून चोरीचा प्रयत्न केला. तसेच घरातील कपाट फोडत त्यातील काही मुद्देमाल हाती मिळेल या आशेने यातील सामान विस्कटून टाकले.चोरट्यांनी घरातील इतर वस्तूही विस्कटून टाकल्या. मात्र, अज्ञात चोरट्यांना या चोरीत काहीही मुद्देमाल हाती मिळाला नाही. बुधवारी सकाळी ही गोष्ट लक्षात आल्यावर पोलीस पाटील संजय गोरुले यांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांसोबत पाहणी केली व ही माहिती कासार्डे दूरक्षेत्राला दिली.याबाबत अधिक तपास कासार्डे पोलीस करीत आहेत. काही दिवसांपूर्वी याच घरात चोरीचा प्रयत्न झाला होता. यामुळे काही दिवस थांबलेले चोरीचे सत्र पुन्हा सुरू झाले की काय? अशी भीती ग्रामस्थांमधून व्यक्त होत असून या चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हाsindhudurgसिंधुदुर्गPoliceपोलिस