सिंधुदुर्ग : सावंतवाडी शहरात सध्या मोठ्या प्रमाणात फटाक्यांचा कचरा पहायला मिळत असून ठिकठिकाणी रस्त्यावर पडलेला हा कचरा पालिका कर्मचारी गोळा करीत शहर स्वच्छतेवर मोठ्या प्रमाणात भर देत आहेत. गणेश चतुर्थी काळात बालगोपाळ मंडळींची आवडती वस्तू म्हणजे फटाके. विविध प्रकारचे फटाके सध्या बाजारात दाखल झाले आहेत. त्यांचे आकर्षणही तितकेच आहे.वर्षातून येणाऱ्या आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना फटाक्यांची आतषबाजी सावंतवाडी शहरात मोठ्या प्रमाणात पहायला मिळत आहे. हे बाळगोपाळ आनंदाने दिवसभर फटाके फोडत असल्यामुळे शहर प्रदूषित होण्याबरोबर कागदी कचरा परिसरात तयार होत आहे.सध्या या कचºयाची मोठी डोकेदुखी पालिका सफाई कामगारांना जाणवू लागली असून ते न कंटाळता एक सेवा म्हणून न चुकता दररोज सकाळी शहर स्वच्छ करताना दिसून येत आहेत. शहरातील मोती तलाव गणपती विसर्जनाच्या ठिकाणी अशा कचऱ्याचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात पहायला मिळत आहे.
सिंधुदुर्ग : सावंतवाडीत शहर स्वच्छतेवर भर, फटाक्यांमुळे कचरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 17:27 IST
सावंतवाडी शहरात सध्या मोठ्या प्रमाणात फटाक्यांचा कचरा पहायला मिळत असून ठिकठिकाणी रस्त्यावर पडलेला हा कचरा पालिका कर्मचारी गोळा करीत शहर स्वच्छतेवर मोठ्या प्रमाणात भर देत आहेत.
सिंधुदुर्ग : सावंतवाडीत शहर स्वच्छतेवर भर, फटाक्यांमुळे कचरा
ठळक मुद्देसावंतवाडीत शहर स्वच्छतेवर भर, फटाक्यांमुळे कचरापालिका कर्मचाऱ्यांकडून कचऱ्याचे निर्मूलन