सारसबाग झाली चकाचक! फटाक्यांचा कचरा काढून परिसर केला स्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 12:06 PM2017-10-23T12:06:07+5:302017-10-23T12:33:49+5:30

दिवाळीत फटाके आदींचा रस्त्यावर पडलेला कचरा सामर्थ्य प्रबोधिनीच्या वतीने स्वच्छ करण्यात आला. सारसबाग परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उपक्रम राबविण्यात आला.

Cleanness campaign in sarasbaug | सारसबाग झाली चकाचक! फटाक्यांचा कचरा काढून परिसर केला स्वच्छ

सारसबाग झाली चकाचक! फटाक्यांचा कचरा काढून परिसर केला स्वच्छ

Next
ठळक मुद्देचिनी आकाशदिव्यांना, फटाक्यांना बंदी असताना नागरिकांनी सर्रासपणे त्याचा वापर केला.पुढील वर्षी पर्यावरणाची होणारी नासाडी रोखण्यासाठी अधिक प्रयत्न करणार : सामर्थ्य प्रबोधिनी

पुणे : दिवाळीत फटाके, लटकत असलेले आकाशदिवे आदींचा रस्त्यावर पडलेला कचरा सामर्थ्य प्रबोधिनीच्या वतीने स्वच्छ करण्यात आला. सारसबाग परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उपक्रम राबविण्यात आला.
दिवाळीनिमित्त विविध संस्थांकडून कार्यक्रम आयोजित केले जातात. नागरिकांची देखील अशा कार्यक्रमांना गर्दी झालेली पहावयास मिळते. पणत्या, फटाके, चिनी आकाशदिवे या माध्यमातून नागरिकांनी हा उत्सव साजरा केला. हे करीत असताना अनेकांनी सामाजिक भान ठेवणे गरजेचे आहे. फटाके उडविल्यानंतर रस्त्यावर त्याचा जागोजागी कचरा पहावयास मिळतो. तो स्वच्छ करण्यासाठी मात्र पुढाकार घेणे गरजेचे आहे. महानगरपालिका प्रशासनाने चिनी आकाशदिव्यांना, फटाक्यांना बंदी केली असताना नागरिकांनी सर्रासपणे त्याचा वापर केला. अनेक ठिकाणी झाडांना हे दिवे लटकत असल्याचे चित्र दिसत होते, अनेक पक्षी जखमी झालेले आढळले. या पार्श्वभूमीवर सामर्थ्य प्रबोधिनीच्या माध्यमातून सलग दुसर्‍या वर्षी स्वछता मोहीम घेण्यात आली. तसेच कार्यकत्यांसोबत नागरिकांनीही या मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. कार्यकर्त्यांनी सरसबागेचे विविध भाग वाटून घेऊन स्वच्छ  केले. 


सामर्थ्य प्रबोधिनीचे अध्यक्ष सुशांत भिसे यांनी सांगितले, की पुढील वर्षी असे सांकृतिक कार्यक्रम रोखण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून पर्यावरणाची होणारी नासाडी रोखण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. प्रसंगी प्रशासन, विविध सामाजिक संस्था आणि संघटना यांची मदत घेतली जाईल. तसेच पाथनाट्य, फलक, रांगोळ्या या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचा मानस असल्याचे संस्थेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Cleanness campaign in sarasbaug

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.