शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : 'निपाहच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये भीती, पालिकेने वटवाघळांचा बंदोबस्त करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 15:49 IST

निपाह या साथीच्या रोगाने केरळमध्ये थैमान घातले असताना हा रोग ज्या प्राण्यामुळे मनुष्यात पसरतो, त्या वटवाघळांचा प्रश्न सावंतवाडी-खासकीलवाडा परिसरात निर्माण झाला असून, नागरिकांमधून भीती व्यक्त करण्यात येत आहे.

ठळक मुद्दे'निपाहच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये भीतीपालिकेने वटवाघळांचा बंदोबस्त करावा

सावंतवाडी : निपाह या साथीच्या रोगाने केरळमध्ये थैमान घातले असताना हा रोग ज्या प्राण्यामुळे मनुष्यात पसरतो, त्या वटवाघळांचा प्रश्न सावंतवाडी-खासकीलवाडा परिसरात निर्माण झाला असून, नागरिकांमधून भीती व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, याबाबत स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष संजू परब यांनी नाराजी व्यक्त केली असून, या ठिकाणी स्थिरावलेल्या वटवाघळामुळे आजार निर्माण झाल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न करीत पालिकेने तत्काळ ठोस पाऊले उचलत या वटवाघळांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे.येथील खासकीलवाडा भागात राजवाडा परिसराच्या मागे तसेच आरेकर कॉलनी, दीपदर्शन अपार्टमेंट परिसरात तसेच वारंग कॉलनी परिसरात मोठ्या प्रमाणात वटवाघळांचा वावर आहे. दरम्यान त्यांची संख्या कमी करण्यासाठी पालिकेने अद्यापपर्यंत कोणतीही उपाययोजना केलेली नाही.दरम्यान, याबाबत बुधवारी तालुकाध्यक्ष परब यांनी आक्रमक भूमिका घेत याबाबत पत्रकारांना घटनास्थळी नेऊन माहिती दिली. यावेळी पंचायत समिती सभापती रवी मडगावकर, माजी नगरसेवक सुदन आरेकर आदी उपस्थित होते.यावेळी परब म्हणाले. निपाह हा आजार अगदी गोव्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. असे असताना शहरात मोठ्या प्रमाणात असलेल्या या वटवाघळांचा बंदोबस्त करण्यासाठी पालिकेने कोणतीही उपाययोजना केलेली नाही.

सद्यस्थिती लक्षात घेता लहान मुले आंबे, जाम आदी फळे बाहेर पडलेली खातात. त्यामुळे त्यांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुढे होणारे परिणाम लक्षात घेता पालिकेने योग्य ती भूमिका घ्यावी. अन्यथा पक्षाकडून आंदोलन केले जाईल.दरम्यान, माजी नगरसेवक आरेकर म्हणाले, वटवाघळांचे प्रमाण लक्षात घेता प्रश्न गंभीर आहे. याबाबत योग्य ते आदेश आरोग्य प्रशासनाला देण्यात यावेत, अशी मागणी आपण पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे करणार आहे. खासकीलवाडा परिसरात स्थिरावलेल्या वटवाघळांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येणार आहे 

टॅग्स :Nipah Virusनिपाह विषाणूsindhudurgसिंधुदुर्ग