शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : रासायनिक शेती हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करणार : सुधीर सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 14:26 IST

सध्याच्या वाढत्या रासायनिक शेतीमुळे विषारी अन्न निर्माण होत असून मानवी आरोग्य धोक्यात आले आहे. लोकांना विषमुक्त अन्न मिळून जिल्ह्यातील रासायनिक शेती हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

ठळक मुद्देरासायनिक शेती हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करणार : सुधीर सावंतसुभाष पाळेकर यांच्या उपस्थितीत ३०, ३१ ला नैसर्गिक शेती कार्यशाळा

सिंधुदुर्गनगरी : सध्याच्या वाढत्या रासायनिक शेतीमुळे विषारी अन्न निर्माण होत असून मानवी आरोग्य धोक्यात आले आहे. लोकांना विषमुक्त अन्न मिळून जिल्ह्यातील रासायनिक शेती हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

नैसर्गिक शेतीचे प्रणेते पद्मश्री डॉ. सुभाष पाळेकर यांची ३० व ३१ आॅक्टोबर रोजी आंबा, काजू, नारळ, कोकम व भाजीपाला या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी कोकणातील तसेच कोल्हापूर येथून शेकडो शेतकरी उपस्थित राहणार आहेत. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शेतकरी व बागायतदारांनी उपस्थित रहावे, असे आवाहनही सावंत यांनी केले आहे.नैसर्गिक शेती परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. याची माहिती देण्यासाठी ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी ओरोस येथील छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी सचिव दिनानाथ वेरणेकर, उन्मेश बागवे, सुप्रिया निकम, मंदार गीते, विलास सावंत, आशिष पाटील, रेखा खांडेकर, शिरोडकर आदी उपस्थित होते.यावेळी सुधीर सावंत म्हणाले, शेतकऱ्यांचे जीवन आनंदी आणि समृद्ध करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान उत्तम काम करीत आहे. कृषी संशोधन, शिक्षण, विस्तार व सल्ला सेवा या क्षेत्रात गेली २० वर्षे ही संस्था कार्यरत आहे. दिवसेंदिवस बदलत्या हवामानाचा शेती उद्योगावर मोठा परिणाम होताना दिसून येत आहे.

असंतुलित रासायनिक खते व कीटकनाशके यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे विषारी अन्न निर्माण होत आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न भेडसावत आहे. जमिनीचे आरोग्यही बिघडत चालले असून पिकांच्या उत्पादनात घट होताना दिसून येत आहे.स्वावलंबी ग्रामस्वराज्य मोहीम हातीसध्याच्या शेतीत रासायनिक खतांचा वाढता वापर आहे. हा वाढता वापर आरोग्यास हानिकारक ठरत आहे. परिणामी कर्करोग, मधुमेह, हृदयविकार यासारखे असंख्य आजार यामुळे होत आहेत. या सर्व आजारांना पळवून लावण्यासाठी नैसर्गिक शेती हा एकमेव पर्याय असून त्यासाठी आपण झोकून देऊन काम करणार आहोत.

भविष्यात रसायनिक शेती जिल्ह्यातून हद्दपार करणार. नैसर्गिक शेतीचे खूप फायदे आहेत. नैसर्गिक शेतीमुळे आयुर्मान उंचावते, जमीन सुपीक बनते, खर्च कमी व उत्पादन जास्त मिळते. सध्याच्या सरकारने शेती नाकारत औद्योगिकतेवर जास्त भर दिल्याचे दिसून येत आहे. म्हणून शेती व शेतीमालावर प्रक्रिया हा केंद्रबिंदू ठेवून स्वावलंबी ग्रामस्वराज्य या तत्त्वावर भारताची ग्रामीण अर्थव्यवस्था उभी करण्याची मोहीम हाती घेतली आहे, असेही सुधीर सावंत म्हणाले. 

टॅग्स :Farmerशेतकरीsindhudurgसिंधुदुर्ग