शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग :  पोलीस भरतीच्या पुढील फेरीसाठी ३८७७ उमेदवार पात्र, ३0१ जण बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 16:17 IST

सिंधुदुर्गनगरी येथील पोलीस परेड मैदानावर अत्यंत कडेकोट पोलीस बंदोबस्तात व इन कॅमेरा पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे. एकूण १५०० उमेदवारांना बोलाविण्यात आले होते. यात ९३२ उमेदवार हजर राहिले तर ५८२ उमेदवार अनुपस्थित राहिले.

ठळक मुद्देकडेकोट पोलीस बंदोबस्तात भरती, इन कॅमेरा प्रक्रिया आतापर्यंत ६७२५ उमेदवारांपैकी ३८७७ उमेदवार पात्र

सिंधुदुर्गनगरी : येथील पोलीस परेड मैदानावर अत्यंत कडेकोट पोलीस बंदोबस्तात व इन कॅमेरा पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे. एकूण १५०० उमेदवारांना बोलाविण्यात आले होते. यात ९३२ उमेदवार हजर राहिले तर ५८२ उमेदवार अनुपस्थित राहिले.

शारीरिक चाचणीत ७० उमेदवारांना अपात्र ठरविण्यात आले आहे. मैदानी चाचणीसाठी ८६२ उमेदवार पात्र ठरले आहेत. आतापर्यंत बोलाविण्यात आलेल्या ६७२५ उमेदवारांपैकी ३८७७ उमेदवार पात्र ठरले असून शारीरिक चाचणीत ३०१ उमेदवार बाद झाले आहेत. जिल्ह्यात रिक्त होणाऱ्या ७१ पोलीस शिपाई पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेत राज्यभरातून हजारो उमेदवार सिंधुदुर्गनगरीत दाखल झाले आहेत. ही भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शकरित्या राबविली जात आहे.सोमवार १२ मार्चपासून सुरू झालेल्या या भरतीला आतापर्यंत (१२ ते १४ मार्चपर्यंत) ६७२५ उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलाविण्यात आले होते. त्यापैकी प्रत्यक्षात ४१७८ उमेदवार हजर राहिले तर २५४७ गैरहजर राहिले. हजर असलेल्या ४१७८ उमेदवारांपैकी ३८७७ उमेदवार शारीरिक चाचणीत पात्र ठरले आहेत. तर ३०१ अपात्र ठरले आहेत.बुधवारी सकाळच्या सत्रात १५०० उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलाविण्यात आले होते. त्यापैकी ९३२ उमेदवार प्रत्यक्ष उपस्थित राहिले. तर ५८२ उमेदवार अनुपस्थित राहिले. यात ८६२ उमेदवार पुढील चाचणीसाठी पात्र तर ७० उमेदवारांना शारीरिक चाचणीत अपात्र ठरविण्यात आले.गेल्या तीन दिवसांपासून भरती ठिकाणच्या प्रवेशद्वारावर अधिकारी, कर्मचारी उमेदवारांची कागदपत्रांची पडताळणी करून मैदानी चाचणीसाठी पुढे पाठवित आहेत. पुल अप्स, १०० व १६०० मीटर धावणे, लांब उडी, गोळाफेक हे मैदानी प्रकार घेतले जात आहेत.

पोलीस भरती प्रक्रिया काटेकोरपणे

पोलीस भरती प्रक्रिया अगदी काटेकोरपणे पार पाडण्यात येत असून पोलीस अधीक्षक गेडाम स्वत: लक्ष देत आहेत.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गpolice parade groundपोलिस कवायत मैदान