शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
3
"अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
4
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
5
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
6
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
7
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
8
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
9
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
10
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
11
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
12
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
13
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
14
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
15
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
16
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
17
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
18
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
19
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

सिंधुदुर्ग : वीजवाहिन्या हटविण्यासाठी रॉड्रिक्स कुटुंबीयांचा १० वर्षे लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 5:21 PM

मालवण शहरातील धुरीवाडा सेवांगण मार्ग येथील पावलू जॉन रॉड्रिक्स कुटुंबीय आपल्या परिसरातून जाणाऱ्या धोकादायक वीजवाहिन्या हटविण्यासाठी वीज वितरणशी १० वर्षे लढा देत आहेत. मात्र, वीजवाहिन्या हटविणे अथवा त्यांचा मार्ग बदलणे याबाबत कोणतीही कार्यवाही होत नसल्याने रॉड्रिक्स कुटुंबीय हतबल झाले आहेत.

ठळक मुद्देवीजवाहिन्या हटविण्यासाठी रॉड्रिक्स कुटुंबीयांचा १० वर्षे लढान्याय न मिळाल्यास उपोषण छेडण्याचा इशारा

मालवण : मालवण शहरातील धुरीवाडा सेवांगण मार्ग येथील पावलू जॉन रॉड्रिक्स कुटुंबीय आपल्या परिसरातून जाणाऱ्या धोकादायक वीजवाहिन्या हटविण्यासाठी वीज वितरणशी १० वर्षे लढा देत आहेत. मात्र, वीजवाहिन्या हटविणे अथवा त्यांचा मार्ग बदलणे याबाबत कोणतीही कार्यवाही होत नसल्याने रॉड्रिक्स कुटुंबीय हतबल झाले आहेत.दोन दिवसांपूर्वी या धोकादायक मार्गावरील एक वीजवाहिनी तुटून पडली. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नव्हती. पावलू रॉड्रिक्स हे गेली १० वर्षांहून अधिक काळ सातत्याने वीज वितरणकडे वीजवाहिन्या हटविण्याबाबत पाठपुरावा करीत आहेत.  डेविड, ग्रेसीस हे अन्य दोन भाऊ व कुटुंबीय यांसोबत आम्ही राहत असलेल्या घर परिसरातून या वीजवाहिन्या जातात. मासेमारी साहित्य व अन्य किमती लाकडी साहित्य असलेल्या झोपडी जवळून वीजवाहिन्या जातात. येथे स्पार्किंग होऊन झोपडी आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्याचा तसेच अन्य अपघात होण्याचा धोका आहे. आमच्या माड बागायतीतील काही झाडांची झावळे वीजवाहिन्यांना स्पर्श करतात म्हणून वीज कर्मचारी सातत्याने तोडतात. त्यामुळेही आमचे नुकसान होत आहे. लगतच्या वीज ग्राहकांना अन्य वीज मार्गांची उभारणी झाली आहे. अशा स्थितीत आमच्या परिसरातून जाणाऱ्या धोकादायक स्थितीतील विनापरवाना वीजवाहिन्या हटवाव्यात अशी मागणी पावलू  रॉड्रिक्स यांनी केली आहे. तसेच न्याय न मिळाल्यास उपोषण छेडण्याचा इशारा दिला आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणsindhudurgसिंधुदुर्ग