शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
13
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
14
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
15
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
16
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
17
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
18
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
20
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"

चिपळुणात कडकडीत बंद पाळून काढला मूकमोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 7:25 PM

चिपळूण : जम्मू-काश्मिरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ चिपळुणातील व्यापाऱ्यांनी बंदची हाक दिली. त्यामुळे चिपळुणात कडकडीत बंद पाळण्यात ...

ठळक मुद्देव्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रिक्षा व्यावसायिकांचाही सहभाग

चिपळूण : जम्मू-काश्मिरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ चिपळुणातील व्यापाऱ्यांनी बंदची हाक दिली. त्यामुळे चिपळुणात कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदमध्ये रिक्षा व्यावसायिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होवून रिक्षा व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवला होता.

 शहरातील रिक्षा स्टॉपवर एकही रिक्षा दिसत नव्हती. त्यामुळे अनेकांची गैरसोय झाली. एस.टी.सेवा व अत्यावश्यक सेवा फक्त सुरु होती. त्यामुळे बाजारपेठेत तुरळक गर्दी दिसत होती. चिपळुणातील सर्व व्यापारी बंदमध्ये सामील झाले होते.जम्मू-काश्मिर पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी भ्याड हल्ल्यात ४४ जवान शहीद झाले होते. याचा निषेध करण्यासाठी  चिपळुणातील व्यापारी संघटनेची बंद संदर्भात बैठक झाली. या बैठकीनंतर चिपळूणात बंदची हाक देण्यात आली. शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रापासून ते बाजारपेठपर्यंत मूकमोर्चा काढून निषेध नोंदविण्यात आला.

या मूकमोर्चामध्ये नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष वासुदेव भांबुरे, शैलेश वरवाटकर, मंदार ओक, वसंत कारंडे, उदय गांधी, सलीम मोटलानी, अफजल कच्छी, अस्लम मेमन, शादाब मेमन, सिध्देश लाड, उद्योजक नासिर खोत, नाझिम अफवारे, उदय चितळे, आशिष जैन, रुपेश जैन, मंगेश वेस्वीकर, उदय ओतारी, रिक्षा चालक-मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू खेतले, दिलीप खेतले, भाजपा शहराध्यक्षा वैशाली निमकर, लायन्सच्या सुप्रिया गुरव, माजी नगरसेविका रिहाना बिजले, निर्मला चिंगळे, संगिता पालकर, नगरसेविका रसिका देवळेकर, प्रितम देवळेकर, शिवानी पवार, सफा गोठे, नुपूर बाचीम, संजीवनी शिगवण, नगरसेवक कबीर काद्री, विजय चितळे, करामत मिठागरी, आशिष खातू, भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मोरे, स्वाभिमान संघटनेचे अजय साळवी, युवक शहराध्यक्ष प्रफुल्ल पिसे यांच्यासह नगरसेवक व व्यापारी मोठ्या संख्येने या मूकमोर्चामध्ये सहभागी झाले होते.

जम्मू-काश्मिरमध्ये झालेल्या हल्ल्याबाबत सर्वसामान्यांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. दोन दिवसापूर्वी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी निषेध नोंदवून शहीद जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली होती.

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाRatnagiriरत्नागिरी