सावंतवाडी: सावंतवाडी तालुक्यातील माडखोल जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघात अपक्ष उमेदवारांनी ऐतिहासिक विजय मिळवत आपले खाते उघडले आहे. विशेष म्हणजे विजयी झालेले तिन्ही उमेदवार हे भाजपचे बंडखोर असून त्यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना पराभवाचा धक्का दिला आहे.विजयी उमेदवारांची यादीजिल्हा परिषद मतदारसंघ: शिवानी संजय नाईक (विजयी)पंचायत समिती मतदारसंघ: अवनी राऊळ (विजयी)पंचायत समिती मतदारसंघ: प्रथमेश सावंत (विजयी)
वाचा: सिंधुदुर्गात महायुतीचे वर्चस्व; ७ पैकी ७ जागांवर भाजप आणि शिंदेसेना आघाडीवरबंडखोरीचा फटकाभाजपमधील अंतर्गत नाराजीचा थेट फायदा या अपक्ष उमेदवारांना झाला आहे. कार्यकर्त्यांची ताकद आणि वैयक्तिक जनसंपर्क अधिकृत चिन्हापेक्षा भारी पडल्याचे येथे दिसते. माडखोलमध्ये पक्षनिष्ठेपेक्षा स्थानिक उमेदवारांच्या कामावर मतदारांनी विश्वास दाखवल्याचे चित्र आहे.
Maharashtra ZP Election Result 2026 Live: जिल्हा परिषद निकाल: सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपा आणि महायुतीला आघाडीसत्तेची समीकरणे बदलणार?या विजयामुळे आता हे अपक्ष उमेदवार कोणाला पाठिंबा देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामुळे स्थानिक सत्तेची समीकरणे बदलू शकतात.
Web Summary : In Sawantwadi's Madkhol, independents, BJP rebels, secured victory in Zilla Parishad and Panchayat Samiti elections. Internal BJP dissent fueled their win, proving local connections outweigh party affiliation. All eyes are on their support, potentially reshaping local power dynamics.
Web Summary : सावंतवाड़ी के माडखोल में, निर्दलीय उम्मीदवारों, जो भाजपा के बागी थे, ने जिला परिषद और पंचायत समिति चुनावों में जीत हासिल की। भाजपा के भीतर असंतोष ने उनकी जीत को बढ़ावा दिया, जिससे साबित हुआ कि स्थानीय संबंध पार्टी संबद्धता से अधिक महत्वपूर्ण हैं। सबकी निगाहें उनके समर्थन पर हैं, जो स्थानीय सत्ता समीकरणों को बदल सकता है।