शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

शॉर्ट सर्किटने कणकवलीत घराला आग; लाखोंचे नुकसान

By सुधीर राणे | Updated: December 18, 2024 12:29 IST

कणकवली : बांधकाम व्यावसायिक उदय लवू पवार यांच्या कणकवली सोनगेवाडी येथील कृपासावली या बंगल्याला शॉर्ट सर्किटने आग लागून लाखो ...

कणकवली : बांधकाम व्यावसायिक उदय लवू पवार यांच्या कणकवली सोनगेवाडी येथील कृपासावली या बंगल्याला शॉर्ट सर्किटने आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही घटना आज, बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. सुदैवाने घरातील कोणालाही दुखापत झाली नाही. 

घटनेची माहिती मिळताच कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह नगरपंचायतच्या अग्निशामक बंबासह घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. आगीत उदय पवार यांच्या कार्यालयामधील सर्व महत्वाची कागदपत्रे, फर्निचर जळून खाक झाले. उदय पवार यांचा सोनगेवाडी येथे दुमजली बंगला आहे. आज, पहाटेच्या सुमारास शॉर्ट सर्किटने त्यांच्या बंगल्यातील तळमजल्यावरील कार्यालयाला आग लागली. त्यानंतर ही आग पसरत हॉलमध्ये आली. उदय पवार व त्यांचे वडील लवू पवार हे पहिल्या मजल्यावर बेडरूममध्ये झोपले होते. आगीमुळे तळमजल्यावरील जळत असलेल्या फर्निचर व अन्य साहित्याच्या आवाजामुळे तसेच धुरामुळे त्यांना जाग आली. स्थानिक नागरिकांनी घरातील पाण्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीचा भडका मोठा असल्यामुळे आग आटोक्यात येत नव्हती. सामाजिक कार्यकर्ते निखिल आचरेकर यांनी तत्काळ माजी नगराध्यक्ष समीर नलावडे याना घटनेची कल्पना देताच त्यांनी कणकवली नगरपंचायतच्या अग्निशामक बंबासह घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. आगीमुळे पहिल्या  मजल्यावर अडकलेल्या लवू पवार व उदय पवार यांना शिडीच्या सहाय्याने खाली उतरविण्यात आले. पोलिस हवालदार चंद्रकांत झोरे  यांनी घटनास्थळी दाखल होत प्राथमिक पंचनामा केला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गfireआगKankavliकणकवली