शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

शाळांनी उघडली दुकाने

By admin | Updated: April 14, 2015 01:10 IST

पालकांना भुर्दंड : प्रत्येक विद्यार्थ्यांच्या माथी महागड्या वह्या अन् पुस्तके

रत्नागिरी : अशासकीय मान्यताप्राप्त मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी आता शिकवणीबरोबरच वह्या - पुस्तके विकण्याची जणू दुकानेच थाटली आहेत. शाळेत प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या माथी वह्या पुस्तके मारून त्यातूनही पैसा उकळण्याचा धंदा शाळांनी सुरु केला आहे. त्यामुळे डोनेशन देताना वैतागलेल्या पालकांना आणखी एक भुर्दंड सोसावा लागत आहे. पाल्याला खासगी शाळेमध्ये प्रवेश मिळवताना हजारो रुपये मोजावे लागत आहेत. त्यातच आता शाळांमधून दिल्या जाणाऱ्या वह्या, पुस्तकांसाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत. शाळेच्या नावाने वह्या छापून त्यांची विक्री केली जात आहे. गणवेश खरेदीसाठीही शाळा आपल्या मर्जीतील एखाद्या कापड व्यावसायिकाची नियुक्ती करतात. त्यामुळे पालकांना सक्तीने त्याच दुकानातून गणवेश खरेदी करावे लागतात. शूज खरेदीसाठीही विशिष्ट विक्रेता निश्चित केला जातो. त्यामुळे शैक्षणिक साहित्य, गणवेश, शूज विक्री ही शाळेतूनच केली जात आहे. त्यातूनही पैसे उकळण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे पालक वैतागले आहेत. पाठ्यपुस्तके आणि वर्कबुक सक्तीने विद्यार्थ्यांच्या माथी मारतात. पुस्तकाच्या मूळ किमतीपेक्षा अधिक पैसे शाळा घेत आहेत. आता तर वह्या पुस्तकांच्या वेष्टनासह अन्य साहित्यांची विक्रीही शाळांनी सुरू केली आहे. बाजारातील किमतीपेक्षा अधिक किंमत पालकांना मोजावी लागत आहे. सर्वशिक्षा अभियानांतर्गत १ ते ८ वर्गातील सर्व विद्यार्थिनी व मागासवर्गीय, अनुसूचित जाती जमातीतील विद्यार्थ्यांना दरवर्षी पुस्तकांचे मोफत वाटप करण्यात येते. मराठी माध्यमाच्या एक लाख ६७ हजार ७६० विद्यार्थ्यांना, तर उर्दू माध्यमाच्या १३०९५ मिळून एकूण १ लाख ८० हजार ८५५ विद्यार्थ्यांना पुस्तकांचा यावर्षी लाभ मिळाला. जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील एकूण विद्यार्थीसंख्या ३ लाख ५२ हजार ६९६ असून, १ लाख ८० हजार ८५५ विद्यार्थ्यांना शासकीय पुस्तकांचा लाभ मिळतो. मात्र, १ लाख ७१ हजार ८४१ विद्यार्थ्यांना पुस्तके विकत घ्यावी लागतात. अनेक शाळा वह्या - पुस्तकांची अनधिकृत विक्री करून नफा मिळवत आहेत. त्याचा पालकांना दरवर्षी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. (प्रतिनिधी)