शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

सिंधुदुर्गचे शिवसेनेचे पदाधिकारी निष्क्रीय : राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 4:39 PM

सिंधुदुर्गचे शिवसेनेच्या तिन्ही पदाधिकाऱ्यानी जिल्ह्याचा बट्ट्याबोळ केला आहे. तिघेही निष्क्रीय आहेत. पालकमंत्री नको ते धंदे करीत सुटले आहेत. या तिघांचेही काम काय ते त्यांनी सांगावे आणि नंतर मते मागावीत. जिल्ह्याच्या इतिहासात एवढा निष्क्रीय पालकमंत्री झाला नाही, असा आरोप नारायण राणे यांनी केला.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात पहिलेच निष्क्रीय पालकमंत्रीपालकमंत्र्यांचे कारनामे उघडे करीनशिवसेनेला ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान करू नकाखासदारांनी एकही प्रकल्प आणला नाहीमहामार्गावरील खड्ड्यांबाबत बांधकाममंत्र्यांशी चर्चासमर्थ विकास पॅनेलच विकास करू शकतो

कणकवली , दि. १४ : सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक या शिवसेनेच्या तिन्ही पदाधिकाऱ्यानी जिल्ह्याचा बट्ट्याबोळ केला आहे. तिघेही निक्रीय आहेत. पालकमंत्री नको ते धंदे करीत सुटले आहेत. ते जातात कधी, येतात कधी तेच कळत नाही. या तिघांचेही काम काय ते त्यांनी सांगावे आणि नंतर मते मागावीत. जिल्ह्याच्या इतिहासात एवढा निष्क्रीय पालकमंत्री झाला नाही, असा आरोप नारायण राणे यांनी केला.

मालवण तालुक्यातील पडवे येथील लाईफलाईन रुग्णालयात शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित देसाई व महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

राणे पुढे म्हणाले, गेल्या तीन वर्षात रेशनिंगवर धान्य नाही. रॉकेल मिळत नाही. सी-वर्ल्ड, विमानतळाचे काम रखडले आहे. आयटी पार्क, दोडामार्ग एमआयडीसी या महत्त्वाच्या कामांबरोबच जिल्ह्यातील रस्ते व पायाभूत सुविधा यांची कामे मी केली होती. पण आता कोणतेच काम मार्गी लागलेले नाही. जिल्ह्याचा विकास ठप्प झाला आहे. जिल्ह्यात कोणतेही काम न करणाऱ्या शिवसेनेला ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान करू नका, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.

पालकमंत्र्यांचे कारनामे उघडे करीनराष्ट्रीय महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पालकमंत्र्यांना हे खड्डे बुजविता आले नाहीत. ते जास्त वेळ गोव्यात असतात. मंत्री महाराष्ट्राचे व गोव्यात जास्त वास्तव्य का? असा सवाल त्यांनी केला. जिल्हाधिकारी कार्यालयात शिपायाला मान आहे तितका मान पालकमंत्र्यांना नाही. सिंधुदुर्गात पालकमंत्र्यांना कोण विचारत नाही. तर महाराष्ट्रात कोण विचारणार, मंत्रालयात ते काय करतात ते जाहीर करीन. पालकमंत्र्यांचे सर्व कारनामे उघडे करीन, असा इशारा राणे यांनी दिला.खासदारांनी एकही प्रकल्प आणला नाहीखासदार विनायक राऊत यांच्यावर त्यांनी सडकून टीका करताना राणे म्हणाले, राऊत यांची १३ प्रकरणे मी बाहेर काढीन. त्यांना सभागृहात बोलताही येत नाही. कुठे काय बोलावे, काय करावे तेही कळत नाही. खासदारांनी जिल्ह्यात एकही प्रकल्प आणला नाही. राणेंची जास्त बदनामी केल्यास पार्ल्याचा इतिहास सांगावा लागेल. आमदार वैभव नाईक जनतेची दिशाभूल करत आहेत. त्यांनी ३ वर्षात विकासाचे कोणतेही काम केलेले नाही.महामार्गावरील खड्ड्यांबाबत बांधकाममंत्र्यांशी चर्चामुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांबाबत आपण बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा केलेली आहे. मी मुख्यमंत्री, महसूलमंत्री, विरोधी पक्ष नेता अशी पदे भूषविली आहेत. जिल्ह्यात इंजिनिअरिंग महाविद्यालय, मेडिकल महाविद्यालय, डॉन बॉस्को हायस्कूल, ऊर्सुला हे इंग्रजी माध्यमाचे हायस्कूल, रस्त्याची कामे, पायाभूत सुविधा, गावागावातील विकासकामे केली. पण शिवसेनेच्या या तिन्ही पदाधिकाºयांना काहीही जमलेले नाही. माझ्या काळात महाराष्ट्रात सिंधुदुर्गचे नाव होते. आता राज्यात सिंधुदुर्गची बदनामी होत आहे. पालकमंत्री निष्क्रीय आहेत. त्यामुळे त्यांना आपण सोडणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.समर्थ विकास पॅनेलच विकास करू शकतोसमर्थ विकास पॅनेलच विकास करू शकतो. कुणीही दावे करीत असेल तर त्या अपप्रचारावर विश्वास ठेवू नका. कुणाच्या किती ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या त्याची माहिती हवी असेल तर प्रशासनाकडे चौकशी करा, असे आवाहन त्यांनी केले.

२६६१ ग्रामपंचायत सदस्यांपैकी ५५९ सदस्य समर्थ विकास पॅनेलचे बिनविरोध निवडून आले आहेत, असे त्यांनी सांगितले. लोकांनी गावच्या विकासासाठी समर्थ विकास पॅनेलला साथ देणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.लोकमतच्या वृत्ताची दखलघर नोंदणीचे अधिकार तहसीलदारांकडे दिल्यानंतर ग्रामस्थांची कशी ससेहोलपट होते याचे सविस्तर वृत्त लोकमतने प्रसिद्ध केल्यानंतर त्याची दखल घेऊन नवीन घर नोंदणीचे अधिकार ग्रामपंचायतीकडे देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची माहिती नारायण राणे यांनी दिली.

पक्ष नोंदणीचे सोपस्कार २0 आॅक्टोबरपर्यंतमहाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा घटना व उद्देश तयार करण्याचे काम सुरू असून २0 आॅक्टोबरपर्यंत पक्ष नोंदणीसाठीचे सोपस्कार पूर्ण करू, असे त्यांनी सांगितले. २0 आॅक्टोबरनंतर महाराष्ट्रात स्वाभिमान पक्षाचे काम वाढवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माजी खासदार निलेश राणे व आमदार नीतेश राणे यांनी जी आंदोलने केली ती जनतेसाठी केली. मग निलेश व नीतेशवर गुन्हे कशासाठी लावता, असा सवाल त्यांनी केला.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे konkanकोकण