शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी महाराज पुतळा स्थलांतरण: संदेश पारकरांनी बालिश विधाने थांबवावीत, नगराध्यक्ष समीर नलावडेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 16:54 IST

मुख्यमंत्री, पालकमंत्री हे त्यांचे असतानाही मागील अडीच वर्षे छत्रपतींचा पुतळा पारकर व त्यांचे सहकारी स्थलांतर करू शकले नाहीत. मात्र, ते काम कणकवली नगरपंचायत प्रशासनाने करून दाखवले.

कणकवलीकणकवलीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा स्थलांतरणाच्या पार्श्वभूमीवर आमच्यावर विनाकारण आरोप करणाऱ्या संदेश पारकर यांचा पूर्वीचा इतिहास मला चांगलाच माहित आहे. त्यामुळे त्यांनी तोंड उघडायला लावू नये. तसेच दरोडे कोणी घातलेत आणि व्यापाऱ्यांना भर बाजारपेठेत मारहाण कोणी केली ? हे कणकवलीतील जनतेला माहिती आहे. त्यामुळे पारकर यांनी आता बालिश वक्तव्य करणे थांबवावे असा टोला कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी लगावला.कणकवली नगरपंचायत कार्यालयातील नगराध्यक्ष दालनात आज, सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, बांधकाम सभापती ऍड. विराज भोसले, आरोग्य सभापती तथा गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक अभिजित मुसळे, महेश सावंत, राजू गवाणकर आदी उपस्थित होते.नलावडे म्हणाले, कणकवली नगरपंचायत प्रशासनाने विधिवत पूजा करून शिवाजी महाराजांचा पुतळा सुरक्षितपणे नगरपंचायत सभागृहात ठेवलेला आहे. पहाटे ब्रम्हमुहूर्तावर छञपतींचा पुतळा सन्मानाने व सुरक्षित ठिकाणी आणून ठेवलेला आहे. त्यामुळे पारकर यांनी त्याची काळजी करू नये.त्याचप्रमाणे अवैध धंद्यात कोण पुढे असते हे जनतेला माहीत आहे. शहरात नियोजनबद्धपणे विकास काय असतो हे आम्ही दाखवून दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे दैवत होते. मात्र, त्यांच्या शिवसेनेतीलच एक व्यक्ती शिवरायांच्या पुतळा स्थलांतरणाला विरोध करत आहे. याला काय म्हणावे? एकप्रकारे बाळासाहेबांच्या हिंदुत्वाला हा विरोध असल्याचे यातून स्पष्ट होत आहे...अन् सरकार गडगडलेशिंदे गटाने बंड करण्याआधी सकाळी पारकर यांनी उद्धव ठाकरेंच्या हातात हात देत हस्तांदोलन केले आणि संध्याकाळी त्यांचे सरकार गडगडले. अपशकुनी पारकरांच्या विरोधात कणकवलीकरांनी मला बहुमताने नगराध्यक्षपदी निवडून दिले आहे. मुख्यमंत्री, पालकमंत्री हे त्यांचे असतानाही मागील अडीच वर्षे छत्रपतींचा पुतळा पारकर व त्यांचे सहकारी स्थलांतर करू शकले नाहीत. मात्र, ते काम कणकवली नगरपंचायत प्रशासनाने करून दाखवले. त्यामुळे पारकर यांनी पुतळा स्थलांतरणाबाबत न्यायालयात किंवा आणखी कुठेही जावे. तो त्यांचा प्रश्न आहे. मात्र, विनाकारण आरोप थांबवावे. तसेच पुतळा स्थलांतरणाबाबत प्रशासनाकडे साधा अर्ज केला तरी सगळी माहिती पारकर यांना मिळेल. असेही नलावडे म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवलीBJPभाजपाShiv Senaशिवसेना