शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

कोकणातील शिवसेनेचे वलय कृत्रिम : आशिष शेलार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 11:54 IST

Ashish Shelar Bjp Sawantwadi Sindhudurg- कोकणात शिवसेनेचे वलय हे कृत्रिम आहे. त्यांनी नुसती वातावरण निर्मिती केली आहे. शिवसेनेने वेळीच जमिनीवर यावे, अन्यथा त्यांना येथील जनता आगामी निवडणुकीत जमिनीवर आणेल, अशी टीका माजी मंत्री तथा भाजप नेते आशिष शेलार यांनी केली.

ठळक मुद्देकोकणातील शिवसेनेचे वलय कृत्रिम : आशिष शेलार

सावंतवाडी : कोकणात शिवसेनेचे वलय हे कृत्रिम आहे. त्यांनी नुसती वातावरण निर्मिती केली आहे. शिवसेनेने वेळीच जमिनीवर यावे, अन्यथा त्यांना येथील जनता आगामी निवडणुकीत जमिनीवर आणेल, अशी टीका माजी मंत्री तथा भाजप नेते आशिष शेलार यांनी केली.राज्य सरकारने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या नेत्यांच्या सुरक्षेत केलेली कपात हा असुरक्षित मनोवृत्तीच्या सरकारने घेतलेला निर्णय असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.भाजप नेते आशिष शेलार हे सावंतवाडीत आले असता येथील नगरपालिकेत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा बँकेचे संचालक अतुल काळसेकर, भाजप शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, पाणीपुरवठा सभापती उदय नाईक, ॲड. परिमल नाईक, राजू बेग, आनंद नेवगी, नगरसेविका दीपाली भालेकर, महिला शहर मंडल अध्यक्षा मोहिनी मडगावकर, मिसबा शेख, दिलीप भालेकर, महेश पांचाळ, बांदा सरपंच अक्रम खान, बंटी पुरोहित, केतन आजगावकर आदी उपस्थित होते.शेलार म्हणाले, विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपला अपेक्षित निकाल लागला नाही, हे सत्य आहे. त्यामुळे माझ्यासह माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत बावनकुळे यांनी अभ्यासदौरा करून त्यातून धडा घेतला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजप स्थानिक पातळीवरच सक्षम असल्याने वरिष्ठ पातळीवरून कुठल्याही प्रकारे व्यापक दृष्टीने काम करण्याचा प्रश्न नाही.शिवसेनेने आगीशी खेळू नयेराज्याचे नेतृत्व केलेल्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत वर्गीकरण रद्द करायचे आणि दुसरीकडे आमदार वैभव नाईक यांना वर्गीकरण द्यायचे असा अपव्यवहार राज्यात कधीच घडला नव्हता. मात्र, राज्य सरकार दुटप्पी भूमिका घेत असून त्यांनी आगीशी खेळू नये. आगीशी खेळल्यावर काय होते याची अनुभूती त्यांनी घ्यावी, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. 

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारSawantwadiसावंतवाडीBJPभाजपाsindhudurgसिंधुदुर्ग