शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

मल्टीस्पेशालिटी सावंतवाडीत व्हावे ही शिवसेनेची इच्छा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 12:24 IST

मल्टीस्पेशालिटी रुग्णालय हे सावंतवाडीतच व्हावे, अशी शिवसेनेची इच्छा आहे. त्याला आम्ही कोणीही आणि कधीही विरोध केलेला नाही. परंतु त्यासाठी आवश्यक असलेली जागा ही विनामोबदला मिळणे गरजेचे आहेm अशी भूमिका येथे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली.

ठळक मुद्देविनामोबदला जागा मिळणे गरजेचे पदाधिकाऱ्यांची भूमिका; नगराध्यक्षांशीही चर्चा

सावंतवाडी : मल्टीस्पेशालिटी रुग्णालय हे सावंतवाडीतच व्हावे, अशी शिवसेनेची इच्छा आहे. त्याला आम्ही कोणीही आणि कधीही विरोध केलेला नाही. परंतु त्यासाठी आवश्यक असलेली जागा ही विनामोबदला मिळणे गरजेचे आहे. अन्यथा त्या रुग्णालयासाठी मंजूर झालेले पैसे अन्य ठिकाणी जाण्याची भीती आहे, अशी भूमिका येथे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली.यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश परब, विधानसभाप्रमुख विक्रांत सावंत, जिल्हा परिषदेचे गटनेते नागेंद्र परब, तालुकाप्रमुख रुपेश राउळ, उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी, शहर अध्यक्ष बाबू कुडतरकर, शब्बीर मणियार, अनारोजीन लोबो, नारायण राणे आदी उपस्थित होते.मल्टीस्पेशालिटी रुग्णालयावरून खासदार विनायक राऊत यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न झाल्यानंंतर त्यांनी आम्हांला राजघराण्यासह नगराध्यक्ष संजू परब यांना भेटायला सांगितले. त्यानुसार आम्ही ही भेट घेतली. परंतु आपल्याला त्या जागेचा मोबदला हवा, असे राजघराण्याचे म्हणणे आहे.

शहरातील पालिकेची आरक्षित जागा ताब्यात घेण्यासाठी तब्बल २७ कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. त्यामुळे आता याबाबत ३१ जुलैपर्यंत योग्य ती भूमिका घेणे गरजेचे आहे, असे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.याबाबतचा निर्णय एक महिन्याच्या आत व्हावा. त्यासाठी आवश्यक असलेली जागा उपलब्ध करून द्यावी. नाहक कोणी विरोधासाठी विरोध करू नये. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशाप्रकारचे रुग्णालय याठिकाणी उभे राहणे गरजेचे आहे. त्यामुळे नाहक राजकारणाचा प्रयत्न झाला तर ते दुर्दैवी आहे, असेही ते म्हणाले.त्यांच्या भूमिकेशी ठामआमदार दीपक केसरकर यांनी शहरातच रुग्णालय उभारणार, अशी भूमिका घेतली होती. याबाबत आमच्यात आणि त्यांच्यात कोणतेही दुमत नाही. त्यांच्या भूमिकेशी आजही आम्ही ठाम आहोत. परंतु या ठिकाणी विनामूल्य जागा न मिळाल्यास रुग्णालय गमवायचे का? असाही सवाल पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला.नगराध्यक्ष परब यांनी पालकमंत्र्यांचा पुतळा जाळू, असे विधान केले होते. याबाबत सतीश सावंत यांना विचारले असता, ते म्हणाले, नंतर काय ते बघू. बोलणे सोपे असते, असे सांगत त्यांनी नगराध्यक्षांना चिमटा काढला.पूर्णविराम मिळणे गरजेचेसंबंधित जागेचा आम्हांला मोबदला देण्यात यावा, असे राजघराण्याचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे नगराध्यक्ष परब सांगत असलेली जागा ही पालिकेची असल्यामुळे ती आरक्षित करण्यासाठी २७ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. त्यामुळे हे रुग्णालय उभारण्यावरून निर्माण झालेल्या वादाला पूर्णविराम मिळणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.त्यानुसारच घेतली भेटसावंतवाडीत होणारे रुग्णालय अन्य ठिकाणी नेले जात आहे. असे कारण पुढे करून काही विरोधकांकडून खासदार विनायक राऊत यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, या विषयावरुन निर्माण झालेल्या वादळाच्या पार्श्वभूमीवर खुद्द राऊत यांनी आम्हांला दोघांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे जाणून घेण्यास सांगितले. त्यानुसार आम्ही भेट घेतली. 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलsindhudurgसिंधुदुर्गSawantwadiसावंतवाडी