शहरं
Join us  
Trending Stories
1
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
2
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
3
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
4
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
5
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
6
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
7
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
8
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
9
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
10
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
11
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
12
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
13
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
14
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
15
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
16
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
17
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
18
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
19
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
20
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त

Sindhudurg- मंत्री दीपक केसरकरांविरोधात अनोखे आंदोलन,' एप्रिल फुल, आमदार गुल' म्हणत बडवले ढोल 

By अनंत खं.जाधव | Updated: April 1, 2023 18:35 IST

सावंतवाडी : शिवसेना ठाकरे गटाने मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात अनोखे आंदोलन केले. मंत्री केसरकर म्हणजे   एप्रिल फुल ...

सावंतवाडी : शिवसेना ठाकरे गटाने मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात अनोखे आंदोलन केले. मंत्री केसरकर म्हणजे   एप्रिल फुल आमदार गुल अशा घोषणा देत ढोल बडवून केसरकर यांचा निषेध नोंदवला. शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ याच्या नेतृत्वाखाली येथील एसटी बसस्थानकात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मायकल डिसोजा, बाळा गावडे, गुणाजी गावडे, चंद्रकांत कासार, डॉ. जयेंद्र परुळेकर, शब्बीर मणियार, शैलेश गवंडळकर, आबा सावंत, भारती कासार, श्रृतिका दळवी, श्रेया कासार, अर्चना बोंद्रे आदीसह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.सावंतवाडीतील जगन्नाथ उद्यानात मोनोरेल सुरू, बसस्थानक, आंबोली-गेळे कबुलायतदार प्रश्न, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, पंचायत समिती इमारत नवीन जागेत स्थलांतर, एक लाख सेट टॉप बॉक्स आदिची घोषणा केल्या पण प्रत्यक्षात काहीच नाही. मंत्री केसरकर हे पंधरा वर्षे लोकांच्या डोळ्यात धुळ फेकण्याचे काम केले आहे, असा आरोप  करुन यापुढे ते आमदार म्हणून निवडून येणार नाही. यासाठी आम्ही ठाकरे गट म्हणून प्रयत्न करणार असे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी सांगितले. केसकरांनी आपल्या आमदारकी तसेच मंत्रीपदाच्या काळात   बस स्थानकाचे भूमिपूजन केले. त्यावेळी सात कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. मात्र अद्याप पर्यंत ते काम पूर्ण झालेले नाही. झालेले ५० टक्के काम चौकशी करण्यासारखे आहे. या सर्व प्रकारात ठेकेदाराचे लाड आणि जनतेचे हाल करताना केसरकर दिसत आहे, असाही आरोप त्यांनी यावेळी केला.

ठेकेदारांवर कारवाई करू असे केसरकर सांगतात. मात्र अद्याप पर्यंत त्यांनी एकाही ठेकेदारावर कारवाई केली नाही. उलट ठेकेदारांच्या म्हणण्याप्रमाणे ते त्यांना सुविधा देतात त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी पहिल्यांदा येथील बस स्थानकाचे काम पूर्ण करून दाखवावेत, अन्यथा ज्या-ज्या ठिकाणी विकास कामांचे आश्वासन दिली त्या-त्या ठिकाणी जाऊन आम्ही ठाकरे गटाचे पदाधिकारी आंदोलन करणार आहोत, असाही इशारा त्यांनी यावेळी दिला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDeepak Kesarkarदीपक केसरकर Uddhav Thackerayउद्धव ठाकरेagitationआंदोलन